Join us

रोजच्या ३८ लाख प्लॅस्टिक बाटल्यांचे पालिकेपुढे आव्हान, विल्हेवाट लावण्यासाठी पाचशे मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:11 AM

महापालिकेची कार्यालये २१ दिवसांत प्लॅस्टिकमुक्त करण्याची मुदत आयुक्त अजोय मेहता यांनी खातेप्रमुख व सहायक आयुक्तांना दिली आहे. मात्र, त्याच वेळी मुंबईत दररोज ३८ लाख प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर होत असल्याने, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा होत असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे.

मुंबई : महापालिकेची कार्यालये २१ दिवसांत प्लॅस्टिकमुक्त करण्याची मुदत आयुक्त अजोय मेहता यांनी खातेप्रमुख व सहायक आयुक्तांना दिली आहे. मात्र, त्याच वेळी मुंबईत दररोज ३८ लाख प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर होत असल्याने, एवढ्या मोठ्या प्रमाणात जमा होत असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिकेपुढे आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत प्लॅस्टिक बॉटलची विल्हेवाट लावणाऱ्या पाचशे मशिन मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली असून, मुंबई महापालिका आणि पोलिसांमार्फत ही कारवाई होणार आहे. या बंदीवर प्रभावी अंमल होण्यासाठी पालिका प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहते. या अंतर्गत घराघरातील प्लॅस्टिक जमा करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी केंद्र उभारणे, जनजागृती करणे या उपक्रमांचा समावेश आहे. मात्र, प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, या बाटल्यांची विल्हेवाट त्याच ठिकाणी लावणे आवश्यक ठरले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.यासाठी महापालिका मुख्यालय, गेटवे आॅफ इंडिया, सीएसटीएम, फोर्ट, नरिमन पॉइंट या ठिकाणी या बॉटल क्रशिंग मशिन बसविण्यात येणार आहेत. ही मशिन प्लॅस्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावण्यात प्रभावी ठरल्यास, आवश्यकतेनुसार मशिनची संख्या वाढविण्यात येईल. या प्लॅस्टिक बॉटल साठविण्यासाठी जास्त जागा लागेल, म्हणूनच या बाटल्या मशिनमध्ये टाकून त्यांचा चुराडा केल्यानंतर, सुका कचरा ३७ केंद्रांत जमा करणे शक्य होणार आहे.सेलिब्रिटी देणार संदेशप्लॅस्टिक जमा करण्यासाठी महापालिकेने प्लॅस्टिक एकत्र करणारी केंद्र स्थापन केली आहेत. मात्र, नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. उच्च न्यायालयाने प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर, महापालिकेने प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याचबरोबर, प्लॅस्टिकचा वापर बंद करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी नामवंत व्यक्ती, सेलिब्रिटींद्वारे जनजागृती करतील.तीन महिन्यांची मुदत२३ जूनपर्यंत प्लॅस्टिक बंदी अंमलात आणण्याची मुदत आहे. त्यामुळे आपल्या घरातील प्लॅस्टिक जमा करण्यासाठी नागरिकांची धावपळ उडेल. यासाठी प्लॅस्टिक जमा करण्याचे केंद्र वाढविण्याचा पालिकेचा विचार आहे.मुंबईत पाचशे मिलीच्या ३८ लाख, तर पाचशे मिलीपेक्षा कमी असलेल्या २५ लाख प्लॅस्टिक बाटल्या आहेत.मुंबईत प्लॅस्टिक कॅरी बॅग आणि प्लॅस्टिकचे वस्तू बनविणारे ४५५ उत्पादक आहेत.महापालिका मुख्यालय, गेटवे आॅफ इंडिया, सीएसटीएम, फोर्ट, नरिमन पॉइंट या ठिकाणी पाचशे बॉटल क्रशिंग मशिन बसविण्यात येणार आहेत.प्लॅस्टिकचा वापर करणाºयाला पहिल्या वेळेस ५ हजार, दुसºया वेळेस १५ हजार, तिसºया वेळेला २५ हजार रुपये दंड व तीन महिन्यांची जेल होणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका