Join us

परिसंस्थेच्या पुनर्संचनासाठी झाडे लावणे व जोपासना आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:06 AM

न्या. श्रीनिवास अग्रवाल; शहर दिवाणी व सत्र न्यायालयात पर्यावरण दिन साजरालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पृथ्वीवरील परिसंस्थेच्या ...

न्या. श्रीनिवास अग्रवाल; शहर दिवाणी व सत्र न्यायालयात पर्यावरण दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पृथ्वीवरील परिसंस्थेच्या पुनर्संचनासाठी झाडे लावणे व त्यांची जोपासना करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई जिल्हा विधीसेवा समिती अध्यक्ष तथा प्रधान न्यायाधीश, शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई न्या. श्रीनिवास अग्रवाल यांनी केले.

शहर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी न्या. अग्रवाल तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाला न्या. दिनेश कोठलीकर, न्या. प्रशांत राजवैद्य, न्या. गिरीश अग्रवाल, तसेच न्यायालयीन कर्मचारी व न्यायालयीन कर्तव्यावरील पोलीस अधिकारी उपस्थित होते.

चला हिरवळ पसरवूया!

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधीसेवा प्राधिकरणामार्फत ‘चला हिरवळ पसरवूया’ हे अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत कोठेही एक झाड लावा व वृक्ष लागवडीचा फोटो जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या ई-मेलवर पाठवा, असे आवाहन सर्वसामान्य जनता तसेच सरकारी कार्यालयांना करण्यात आले होते. या अभियानास भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे प्राधिकरण सचिव न्या. हितेंद्र वाणी यांनी सांगितले.

...................................