नारळपाणी विक्रेत्यांनाही बसतेय प्लॅस्टिकबंदीची झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:20 AM2018-09-02T03:20:58+5:302018-09-02T03:21:05+5:30
नारळामुळे आरोग्यास अनेक फायदे मिळत असल्याने, नारळाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक नारळ दिवस २ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
- खलिल गिरकर / सागर नेवरेकर / कुलदीप घायवट
मुंबई : नारळामुळे आरोग्यास अनेक फायदे मिळत असल्याने, नारळाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जागतिक नारळ दिवस २ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. नारळाचा वापर आशिया आणि उष्णकटिबंधीय प्रदेशात जास्त करण्यात येत असल्याने आशियाई आणि पॅसिफिक कोकोनट समुदायातर्फे हा दिवस साजरा केला जातो. या संस्थेचे मुख्यालय इंडोनेशिया येथील जकार्ता येथे आहे. नारळ व्यापाऱ्यावर प्लॅस्टिक बंदीचे सावट पडले आहे. नारळाची किंमत वाढल्याने अनेक ग्राहक नारळ पिण्याऐवजी अन्य फळांकडे वळले असल्याची खंत नारळ व्यापाºयाकडून करण्यात येत आहे.
प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणल्यानंतर नारळ पाणी विक्रेत्यांसमोरील आव्हानांत आणखी भर पडली आहे. नारळाच्या किंमतीमध्ये झालेली प्रचंड वाढ, पार्सल नेण्यामध्ये येणाºया विविध अडचणी यांमुळे व्यवसायात मोठी घट झाल्याचे मत नारळ पाणी विक्रेत्यांंनी व्यक्त केले आहे.
नारळाच्या किंमतीत गेल्या दोन वर्षात मोठी वाढ झाली आहे. २५ ते ३० रूपयांना मिळणारे नारळ आता थेट
४५ ते ५५ रूपयांवर गेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या संख्येत घट
झाली आहे. म्हैसूर, वसई येथून
मुंबईत नारळ आणण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र वाढत्या महागाईमुळे झाडावरून नारळ काढणे व मुंबईत आणणे या प्रक्रियेमध्ये मोठी आर्थिक वाढ झाल्याने त्याचा परिणाम साहजिकपणे नारळाच्या किंमतीमध्ये झाल्याने त्याचा फटका बसू लागला आहे.
नारळ विक्री ही आतापर्यंत केरळी नागरिकांची मक्तेदारी समजली जात असे. मात्र, गेल्या काही कालावधीपासून त्यामध्ये उत्तर भारतीय नागरिकांनी घुसखोरी केल्याने त्यांचे प्रमाण वाढीस लागल्याचे चित्र आहे. वैद्यकीय कारणांसाठी नारळ पाणी घेणारा वर्ग व उच्च मध्यमवर्ग हा नारळ पाणी खरेदी करणारा नियमित वर्ग असून इतर जण कधीमधी याकडे वळतात.
गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून या ठिकाणी नारळ विक्री केली जाते. पूर्वीच्या तुलनेत विक्री मध्ये घट होत आहे. आम्ही म्हैसूर येथून नारळ मागवतो, मुंबई परिसरातील नारळांमध्ये तुलनेने कमी पाणी असते त्यामुळे म्हैसूरच्या नारळांना जास्त मागणी असते.
- अमरूल शेख, जीपीओ समोरील नारळ विक्रेता
दिवसेंदिवस या व्यवसायासमोरील आव्हानांमध्ये वाढ होत आहे. पूर्वी नारळाच्या किंमती कमी असल्याने विक्रेत्यांना मिळणाºया नफ्याचे प्रमाण जास्त होते. आता नफ्याचे प्रमाण खालावले आहे. त्यामुळे नवीन पिढीला या व्यवसायात पूर्वीप्रमाणे रस राहिलेला नाही
- हुसेन शेख, बाजारगेट येथील नारळ विक्रेता
मी मागील पाच ते सहा वर्षांपासून नारळविक्रीचा व्यवसाय करतो. म्हैसूर येथून नारळ मुंबईत आणले जातात. सध्या नारळाची किंमत बºयाच प्रमाणात वाढली आहे. गुजरातमधील नारळाच्या पाण्याची चव व दक्षिण भारतातील नारळाच्या पाण्याची चव वेगळी असते.
- प्रमोद शेट्टी, नारळ व्यापारी, धारावी
मंगलूरु भागातून नारळ मुंबईत आयात केले जातात. व्यवसाय नवीन असल्याने थोड्याफार अडचणी येत असतात. मात्र त्यावर मात करुन एकटीने व्यवसाय उभारला आहे..
- वाणी शेट्टी, नारळ व्यापारी, विक्रोळी
गेल्या ४० वर्षांपासून मी गिरगाव चौपाटीवर नारळपाण्याचा व्यवसाय करतो. नारळ हे म्हैसूर व अलिबाग येथून मागवले जातात. प्लॅस्टिक बंदीमुळे पहिल्यासारखा व्यवसाय आता राहिलेला नाही. नारळपाणी पार्सल देता येत नसल्याने कित्येक ग्राहक तुटत चालले आहेत.
- मोईडू आळवी, नारळ व्यापारी, गिरगाव चौपाटी
नारळपाण्यात नैसगिक साखर असल्यामुळे ते शुगर फ्री नाही. त्यात नॅचरल शुगर असून मोठ्या प्रमाणात पोटॅशियम मिनरल असते. पोटॅशियम मिनरल हे आरोग्यासाठी चांगले असते. ते शरीरातील रक्तदाब कमी करण्यास मदत करते.
- शिल्पा जोशी, आहार तज्ज्ञ.
नारळाच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रो न्युट्रीयन असतात. इतर पदार्थांतून मिनरल व पोटॅशियम शरीराला मिळत नाही, ते नारळाच्या पाण्यातून मिळतात. या सगळ््या गोष्टी शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी उपयुक्त असतात. नारळाचे पाणी सोडियम आणि पोटॅशियमचे बॅलन्स मेंटन्स करणारे असते. रुग्णांची तब्येत लवकर बरी होण्यासाठी बºयाचदा नारळाचे पाणी दिले जाते. - गौरी दुर्वे, आहार तज्ज्ञ.