मुंबई: मेट्रोच्या कार शेडसाठी 2700 झाडे कापण्यास विविध स्तरातून तसेच तरुणाईचा देखिल जोरदार विरोध होत आहे. बिग बी अमिताभ बच्चन मंगळवारी यांनी ट्विट करत मेट्रोला समर्थन केले. त्यामुळे काही तरुणांनी आज सकाळी बिग बीच्या घराबाहेर ट्विट ची खिल्ली उडवत निदर्शने केली. यावेळी तुम्ही निदर्शने कशी करता असा सवाल बिग बी च्या सुरक्षा रक्षकांनी केला, तेव्हा लोकशाहीत सर्वांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे असे देखिल त्यांनी सुरक्षा रक्षकांना सुनावले.
अमिताभ बच्चन यांनी काल केलेल्या ट्विट मध्ये, अमिताभ बच्चन यांनी ट्वित करत सांगितले की, माझ्या जवळच्या एका मित्राला तात्काळ रुग्णालयात जायचे असल्याने त्याने कार ऐवजी मेट्रोचा मार्ग स्विकारला. तसेच मेट्रोने प्रवास करुन रुग्णालयातून घरी परतल्यानंतर मित्राने मेट्रो खूप जलद आणि सोयिस्कर असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे प्रदूषणावर जास्तीत जास्त झाडे लावा हाच उपाय असून मी माझ्या बागेत झाडे लावली आहे, तुम्ही लावलीत का? असा सवाल उपस्थित करुन मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना टोला देखील लगावला होता.
तथापी आंदोलनाकर्त्या तरुणाईने त्याची ट्विटला प्रतिउत्तर देतांना आंदोलकांनी आपली भूमिका लोकमतशी मांडतांना सांगितले की, कोणीही मेट्रोच्या विरोधात नाही, प्रत्येकाला झाड लावण्यासाठी बाग नाही. त्यामुळे बिग बीच्या या वक्तव्यामुळे अज्ञान आणि विशेषाधिकार दिसून येतात, मुंबईत खुल्या मोकळ्या जागा आहेत आणि आरे त्यापैकी एक आहे. म्हणूनच हे जतन करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे, एक बाग जंगलाची जागा घेऊ शकत नाही.यावेळी आम्ही त्यांना आरेला भेटायला बोलावले आहे अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
काही नागरिकांनी आज सकाळी त्याच्या बंगल्याबाहेर उभे राहून वरील बाबी सांगत त्याच्या बंगल्याबाहेर उभे राहून त्याच्याकडे आणि त्याच्या चाहत्यांकडे पोचलो. एक आदरणीय आणि प्रभावशाली नागरिक म्हणून आम्ही बिग बी यांच्याकडून सदर विषय समजावून घेऊन यावर मार्ग काढल्यास तो मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचा विजय असेल अशी अपेक्षा शेवटी व्यक्त केली.