मुंबई : काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने बंद करण्यात आलेले वॉकहार्ट रुग्णालय पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. येथील डॉक्टर्स आणि नर्स कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण करून सोमवारपासून रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. आता या रुग्णालयात २० रुग्णावर प्लाझ्मा थेरपी सुरू झाली आहे.वॉकहार्ट रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक जहाबिया खोराकीवाला म्हणाले, आता फक्त कोरोना रुणांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले जाईल. अशा रुग्णांसाठी देखील रुग्णालयात जागा केली आहे ज्यांची प्रकृती जास्त गंभीर नाही आणि त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्याची आवश्यक्ता नाही. रुग्णालयाने चिंताजनक प्रकृती असणाऱ्यांसाठी वीस खाटा तयार करण्यात आले आहेत. तर पुढच्या ४८ तासांत आणखी १८ खाटा जोडल्या जातील. त्यानंतर आवश्यकतेनुसार क्षमता वाढवली जाईल. जगभरात कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपीला डॉक्टरांना चांगले यश मिळाले आहे. वॉकहार्टने २० रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी सुरू केल्याची केली आहे.
CoronaVirus: वॉकहार्टमध्ये २० कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 6:15 AM