प्लॅस्टिक कारवाईतून पावणेचार लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:07 AM2020-03-03T00:07:10+5:302020-03-03T00:07:13+5:30
प्लॅस्टिकवर १ मार्चपासून पूर्णत: बंदी घातली आहे. मागील २ दिवसांत महापालिकेने ४ हजार ८१ आस्थापनांना भेट देत १ हजार २८ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
मुंबई : प्लॅस्टिकवर १ मार्चपासून पूर्णत: बंदी घातली आहे. मागील २ दिवसांत महापालिकेने ४ हजार ८१ आस्थापनांना भेट देत १ हजार २८ किलोग्रॅम प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. ३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेचे पथक विविध आस्थापना, कार्यालये, मॉल येथे धाड टाकून प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. दरम्यान, प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर निर्बंध असतानाही त्यांचा वापर सुरू आहे. मुंबईत प्लॅस्टिक पिशव्यांसह थर्माकोलवर कारवाईसाठी ब्ल्यू स्क्वॉडची स्थापना करण्यात आली होती. मात्र कारवाई थंड पडली होती. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्लॅस्टिकचा वापर रोखण्यासाठी कारवाई वेगाने करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कारवाई सुरू आहे.