Plastic Ban : पालिकेने सुचवले प्लॅस्टिकला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:30 AM2018-06-25T02:30:24+5:302018-06-25T02:30:36+5:30

प्लॅस्टिकला पर्यायी वस्तू व प्लॅस्टिक पुनर्प्रकिया याबाबत वरळी येथे महापालिकेच्या वतीने तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Plastic Ban: The alternative to plastic suggested plants | Plastic Ban : पालिकेने सुचवले प्लॅस्टिकला पर्याय

Plastic Ban : पालिकेने सुचवले प्लॅस्टिकला पर्याय

Next

मुंबई : प्लॅस्टिकला पर्यायी वस्तू व प्लॅस्टिक पुनर्प्रकिया याबाबत वरळी येथे महापालिकेच्या वतीने तीन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले होते. नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडिया येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पुठ्ठा आणि लाकडी ताट, वाटी, चमचे व इतर भांडे, कापडी आणि कागदी पिशव्या, शोभेची कागदी फुले, कागदी मखर, पर्यावरणपूरक देव्हारा, बांबूच्या आणि वेताच्या लाकडाने बनविलेल्या वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
प्लॅस्टिकच्या वस्तूंना पर्यायी वस्तू कोणत्या आणि त्याचा वापर कसा करायचा, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. प्लॅस्टिक वस्तूंना अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे या प्रदर्शनातून दिसून आल्याचे नागरिकांनी सांगितले. लग्न समारंभ, पार्टी किंवा पूजेच्या कार्यक्रमात आधी प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यात येत होत्या. मात्र, आता प्लॅस्टिकऐवजी लाकडी किंवा पुठ्ठ्याच्या भांड्यांचा वापर करता येऊ शकतो.
बदलापूर येथील अमित पारेख यांनी हातांनी तयार केलेली शोभेची कागदी फुले प्रदर्शनात ठेवली होती. ही फुले उपस्थितांचे खास आकर्षण ठरले. उत्सवी या संस्थेमार्फत कागदी मखर प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी या प्रदर्शनाला पर्यावरणमंत्री रामदास कदम, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांनी हजेरी लावली होती.

Web Title: Plastic Ban: The alternative to plastic suggested plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.