Join us

Plastic Ban : मनसेला हवीय वॉटरप्रूफ पिशवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 4:21 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीविरोधात सूर आळवला आहे. प्लॅस्टिकबंदीचा नियम मोडणाऱ्यांविरोधात पाच, दहा आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद अन्यायकारक आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीविरोधात सूर आळवला आहे. प्लॅस्टिकबंदीचा नियम मोडणाऱ्यांविरोधात पाच, दहा आणि २५ हजारांच्या दंडाची तरतूद अन्यायकारक आहे. दंड आकारणाºया अधिकाºयांनी नागरिकांना वॉटरप्रूफ पिशवी द्यावी, अशी मागणी मनसेने केली असून तसे बॅनरच ‘मातोश्री’बाहेर लावण्यात आले आहेत.‘मातोश्री’बाहेर लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये प्लॅस्टिकबंदीविरोधात उपरोधिक टीका करण्यात आली आहे. प्लॅस्टिकबंदी लागू करण्यापूर्वी पर्यावरणमंत्री, महापौर, पालिका आयुक्त आणि नगरसेवकांनी प्लॅस्टिकला पर्याय द्यावा, अशी मागणी या बॅनरमध्ये करण्यात आली आहे. हजारो रुपयांचा दंड घेण्याआधी अधिकाºयांनी लोकांना वॉटरप्रुफ कापडी पिशवी द्यावी. समाजकार्यच करायचे असेल तर ते सर्वसामान्यांना त्रास न देता योग्य कृतीतून करा, असे आवाहन या बॅनरमध्ये करण्यात आले आहे.