Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीच्या दुसऱ्या दिवशी साडेसहा लाख दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:14 AM2018-06-25T04:14:50+5:302018-06-25T04:15:00+5:30
राज्यात दुस-या दिवशीही प्लॅस्टिकबंदीची कारवाई सुरूच होती. व्यापाºयांना साडेसहा लाखांवर दंड करण्यात येऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या.
मुंबई : राज्यात दुस-या दिवशीही प्लॅस्टिकबंदीची कारवाई सुरूच होती. व्यापाºयांना साडेसहा लाखांवर दंड करण्यात येऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. नाशिक, अहमदनगर, कोल्हापूरमध्येही मोठ्या प्रमाणात धडक कारवाई करण्यात आली.
नाशिकला रविवारी २७ जणांविरुद्ध केलेल्या कारवाईत १ लाख ३५ हजारांचा दंड करण्यात आला. अहमदनगरमध्ये नऊ दुकानदारांवर कारवाई झाली. ४५ हजार रुपये दंड आकारण्यात आला. कोल्हापुरात सहा दुकानदारांवर कारवाई करत ३० हजार रुपये दंड वसूल केला. सांगली आणि सातारा, सोलापुरात रविवारी कोणतीही कारवाई झाली नाही.
बीड, जालना, परभणी आणि नांदेड या चारच जिल्ह्यांत कारवाई झाली. इतर जिल्हे अजुनही जनजागृतीमध्येच अडकलेले दिसले. जालन्यात १० हजार, परभणीत १५ हजार, नांदेडमध्ये ४५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला़ रस्त्यावर कचरा टाकणाºयांनाही अडीच हजारांचा दंड झाला. नागपूरमध्ये दुसºया दिवशी कारवाई थंडावली. दोन जणांना नोटीस देऊन सुमारे ९ हजार दंड वसूल करण्यात आला.
कापडी पिशवी वापरणाºयांना पुष्पगुच्छ
दुधासाठी किटली व मिठाई घेण्यासाठी कापडी पिशवी घेऊन येणाºयांना नाशिकला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.