प्लॅस्टिकबंदी : आदित्य ठाकरे मंत्रालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 06:02 AM2018-06-28T06:02:31+5:302018-06-28T06:02:39+5:30

प्लॅस्टिकबंदीवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची भेट घेतली.

 Plastic Bandi: Aditya Thakre in Mantralaya | प्लॅस्टिकबंदी : आदित्य ठाकरे मंत्रालयात

प्लॅस्टिकबंदी : आदित्य ठाकरे मंत्रालयात

Next

मुंबई : प्लॅस्टिकबंदीवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मंत्रालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. बंदीमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच भावी पिढ्यांसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्लॅस्टिकबंदी आणि दंडाच्या रकमेवरून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता आदित्य यांनी भाष्य करणे टाळले. देशातील १७ राज्यांमध्ये प्लॅस्टिकबंदी आहे. सहा महिने या सर्वांचा अभ्यास करूनच बंदीचा निर्णय घेण्यात आला. बंदी लागू करण्यापूर्वी अनेक स्वयंसेवी संस्थाच प्लॅस्टिकच्या समस्येबद्दल आवाज उठवत होत्या. प्लॅस्टिकवर बंदीची मागणी केली जात होती.

Web Title:  Plastic Bandi: Aditya Thakre in Mantralaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.