Join us

भिवंडीत प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:08 AM

भिवंडी : भिवंडी शहराजवळील खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मच्छा कंपाउंड येथे प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास बुधवारी सकाळी भीषण आग ...

भिवंडी : भिवंडी शहराजवळील खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मच्छा कंपाउंड येथे प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यास बुधवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला. आग इतकी भयंकर असल्याने आगीच्या ज्वाळांनी सिमेंटचे पत्रे उडाले असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीमुळे जवळील गोदामात साठवून ठेवलेले प्लास्टिकचे मणी असलेला साठाही जळून खाक झाला आहे.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. कारखान्यांमध्ये काम करणारे तब्बल दहा कामगारांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत बाहेर पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीचे कारण अजून स्पष्ट नसले तरीही प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर रसायनांचा साठा असल्याने त्या रसायनांनी पेट घेतल्याने या आगीने रौद्ररूप धारण केले होते. तीन तासांनी या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले.

खोणी भागात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक मणी बनविण्याचे कारखाने आहेत; परंतु त्यांच्याकडे अग्निसुरक्षेची कोणतीही उपाययोजना नसल्याने या आगीत इतरांचेही नुकसान होत असून, होणाऱ्या प्रदुषणाकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

फोटो ओळ :

भिवंडीजवळील प्लास्टिक मणी बनविण्याच्या कारखान्याला लागलेली आग.

१० भिवंडी फायर नावाने फोटो