रेल्वेस्थानकांवर ‘प्लॅस्टिक बॉटल क्रशर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:10 AM2018-05-17T06:10:51+5:302018-05-17T06:10:51+5:30
राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकांत प्लॅस्टिक बॉटल क्रशर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी रेल्वे प्रशासनाने स्थानकांत प्लॅस्टिक बॉटल क्रशर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीच्या स्थानकांवर या मशिन बसवण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील १७ स्थानकांसाठी मध्य रेल्वेने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या २० स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
राज्याच्या प्लॅस्टिक बंदीच्या घोषणेनंतर सर्वाधिक वर्दळीचे प्रवासी वाहतूक व्यवस्था असलेल्या रेल्वे प्रशासनानेदेखील प्लॅस्टिक बंदीबाबत हालचाली सुरू केल्या. यानुसार, स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची बैठक बोलावली. टप्प्याटप्प्याने मध्य रेल्वेच्या सर्व गर्दीच्या स्थानकांवर प्लॅस्टिक क्रशर मशिन उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे यांसह १७ प्रमुख स्थानकांवर पहिल्या टप्प्यात क्रशर मशिन बसविण्यात येणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने नुकत्याच निविदा जाहिर केल्या आहेत. सद्यस्थितीत चर्चगेट स्थानकात प्लॅस्टिक मशिन कार्यरत आहे. पश्चिम रेल्वे पहिल्या टप्प्यात २० रेल्वे स्थानकांवर क्रशर मशिन उभारणार आहे.