Join us

प्लॅस्टिक करतेय पर्यावरणाचा -हास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 3:33 AM

जागतिक पर्यावरण दिनाचे यंदाचे घोषवाक्य ‘बीट प्लॅस्टिक पोल्यूशन’ आहे. प्लॅस्टिक हे पर्यावरणाच्या -हासाचे कारण बनले आहे, असे जगभरातील देशांनी मान्य केले आहे. जगभरात दरवर्षी ५०० अब्ज प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातोय.

- कुलदीप घायवटमुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे यंदाचे घोषवाक्य ‘बीट प्लॅस्टिक पोल्यूशन’ आहे. प्लॅस्टिक हे पर्यावरणाच्या ºहासाचे कारण बनले आहे, असे जगभरातील देशांनी मान्य केले आहे. जगभरात दरवर्षी ५०० अब्ज प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला जातोय. दरवर्षी महासागरात अंदाजे ८ दशलक्ष टन कचरा फेकला जातोय. जगभरात दरमिनिटाला १ दशलक्ष पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात. त्यामुळे प्लॅस्टिकचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे यंदाच्या घोषवाक्यातून जगभरातील देशांनी संदेश घेण्यासारखे असून, ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने पर्यावरणवादी आणि पर्यावरणतज्ज्ञांनी वेळीच सावध होण्याचे आवाहन केले आहे.पर्यावरणतज्ज्ञ गिरीश राऊत यांनी सांगितले की, जगातील चारही महासागरांत प्लॅस्टिकचा कचरा साचला आहे. दरवर्षी प्लॅस्टिक कचऱ्यात १८० कोटी टन वाढ होते. आशियातील सर्वात लांब नदी असलेली यांगस्ते नदी प्लॅस्टिकने भरली आहे. आपल्या देशातील नद्यांचीदेखील अशीच परिस्थिती आहे. मिठी नदी, माहीम खाडी, गंगा, यमुना, बंगालचा उपसागर यामध्ये प्लॅस्टिक साचून आहे.देशातील प्रत्येक तिवरांच्या प्रदेशात प्लॅस्टिक कचºयाचा खच पडलेला आहे. प्लॅस्टिक वापरामुळे मानवाला सुखाचे दिवस आले आहेत, असे वाटत आहे. मात्र १९९० सालापासून प्लॅस्टिकचे गंभीर रूप दिसून आले आहे.इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत प्लॅस्टिकचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच दर २ मिनिटाला इलेक्ट्रॉनिक कचरा वाढला असून महासागरात टाकला जात आहे. प्लॅस्टिक बनविताना क्रूड आॅईलचा वापर करण्यात येतो. त्यातून विषारी वायू तयार होऊन त्याचे रूपांतर वायुप्रदूषणात होत आहे. प्लॅस्टिकची पुनर्प्रकि या करणेदेखील चुकीची पद्धत आहे. यामुळे विनाशाचा प्रश्न मिटला जात नाही.- समुद्रातील प्लॅस्टिक कचºयामुळे जलचरांना धोका निर्माण झाला आहे. प्राण्यांनी प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढावला आहे. राज्य प्लॅस्टिकमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे. प्लॅस्टिक आणि थर्माकोल वापरणाºयावर शासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यावरणाविषयी जागृत राहून मुळासकट प्लॅस्टिकचा वापर बंद केला तरच शासन निर्णयाची खºया अर्थाने अंमलबजावणी होईल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.मुंबई शहरात प्लॅस्टिकच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक कचरा वाढला आहे. प्लॅस्टिक प्रदूषणामुळे अनेक प्रकारच्या प्रदूषणाला मानवाला सामोरे जावे लागत आहे. अनेक नवनवीन आजार ओढावून घेतले जात आहेत. प्लॅस्टिक कचरा नाले, गटारे तुंबल्यामुळे पूर परिस्थिती ओढवली जात आहे.प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते, हे विज्ञानाने मान्य केलेले आहे. प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. समुद्रात प्लॅस्टिक साचल्यामुळे जलचरांना धोका निर्माण झाला आहे. प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने नाले तुंबण्याच्या घटना होतात. शासनाकडून प्लॅस्टिकला पर्यायी गोष्टी निर्माण करणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकच्या वापराला बंदी करून पर्यावरणपूरक अशा कापडी पिशव्या वापरण्यावर भर दिला पाहिजे.- संजय शिंगे, पर्यावरणवादीप्लॅस्टिक उत्पादक आणि प्लॅस्टिक विक्रेते यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. प्लॅस्टिकचा वापर करणाºयावर दंडात्मक कारवाई व्हायला पाहिजे. नागरिकांनी स्वत:हून प्लॅस्टिकचा त्याग केला तरच संपूर्णत: प्लॅस्टिक बंदी होईल. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ºहास मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे.- डी. स्टॅलिन, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :वातावरण