"प्लास्टिक मुक्तीचा ध्यास कौतुकास्पद, लोकसहभागाने उत्तम यश मिळेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 09:59 PM2023-08-03T21:59:43+5:302023-08-03T22:00:29+5:30

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून भामला फाउंडेशनचे कौतुक

Plastic free hotel industry in Mumbai Initiative is great start says Minister Sudhir Mungantiwar | "प्लास्टिक मुक्तीचा ध्यास कौतुकास्पद, लोकसहभागाने उत्तम यश मिळेल"

"प्लास्टिक मुक्तीचा ध्यास कौतुकास्पद, लोकसहभागाने उत्तम यश मिळेल"

googlenewsNext

Sudhir Mungantiwar, Amruta Fadnavis, Plastic Free Mumbai: मुंबईतील हॉटेल उद्योग प्लास्टिक मुक्त करण्याचा ध्यास कौतुकास्पद असून त्यात लोकसहभागाने उत्तम यश मिळेल, अशा शब्दात महाराष्ट्राचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भामला फाऊंडेशनचे कौतुक केले. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इकोबिझ या पर्यावरण विषयक जागृती अभियानाचा शुभारंभ भामला फाऊंडेशन मार्फत बांंद्रा येथे नुकताच करण्यात आला.

कॉर्पोरेट्स, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी तसेच फिल्म इंडस्ट्रीतील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी भामला फाऊंडेशतर्फे उभारण्यात आलेल्या इकोबिझ चॅप्टरचे या कार्यक्रमात मुनगंटीवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे आणि इस्राईलचे वाणिज्यदूत श्री कोब्बी शोशानी यांच्यासह हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि व्यापार व सिने जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

भामला फाउंडेशनतर्फे सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमातून व्यवसायांना पर्यावरण पूरक व्यापार पद्धतींसाठी एकत्र आणण्यासाठी आणि आवश्यक ठिकाणी शाश्वत बदल करून सहयोगी उपाय शोधण्यावर भर देण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे मुंबई शहरात प्लास्टिक मुक्तीतून सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आणि सर्वांसाठी चांगले वातावरण निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. मुख्यतः मुंबईतील हॉटेल उद्योगात असलेल्या पंचतारांकित ते छोट्या उपाहारगृहापर्यंत सर्व प्रकारच्या खाद्य सेवांमधून प्लास्टिक मुक्तीचे ध्येय समोर ठेवले गेले आहे.

Web Title: Plastic free hotel industry in Mumbai Initiative is great start says Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.