मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या काळात मंदावलेल्या प्लॅस्टिकवरील कारवाईला पुन्हा वेग येणार आहे. मात्र पहिल्या कारवाईतच दंडाची रक्कम कमी करून थेट २०० रुपयांवर आणण्याचा प्रस्ताव विधि समितीने फेटाळला. दंडाची रक्कम कमी करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, याकडे लक्ष वेधल्यानंतर पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतला आहे. परिणामी, प्लॅस्टिक कारवाईची रक्कम पाच हजार रुपये असणार आहे.गेल्या वर्षी २३ जूनपासून संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक व थर्माकोलवर बंदी लागू करण्यात आली. सुरुवातीच्या काळात या कारवाईने वेग घेतला. प्लॅस्टिकचा वापर करणारे दुकानदार, फेरीवाले आणि व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतून ग्राहकांना म्हणजेच मुंबईकरांना तूर्तास वगळण्यात आले आहे. परंतु, सर्वसामान्य विक्रेत्यांकडून वसूल करण्यात येणाऱ्या पाच हजार रुपये दंडाबाबत नाराजी व्यक्त होत होती.प्लॅस्टिक आढळल्यास पहिल्या वेळेला पाच हजार रुपये दंड आकारण्यात येतो. तर दुसºया वेळी १० हजार रुपये, पण ही रक्कम मोठी असल्याने सर्वसामान्य विक्रेते आणि फेरीवाल्यांना परवडणारी नाही. या रकमेवरून वादही होत असत. त्यामुळे दंडाची रक्कम कमी करण्याचा प्रस्ताव विधि समितीकडे प्रशासनाने मांडला होता. परंतु, यापूर्वी एकदा हा प्रस्ताव विधि समितीने फेटाळला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव प्रशासनाने आता मागे घेतला आहे.तत्कालीन विधि समिती अध्यक्षा सुवर्णा करंजे यांच्या कार्यकाळातही प्रशासनाने असा प्रस्ताव मांडला होता. परंतु राज्य सरकारचा निर्णय बदलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत विधि समितीने हा प्रस्ताव फेटाळला. समितीत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर स्थायी समिती आणि पालिका महासभेची मंजुरी घ्यावी लागली असती.मुंबई पालिकेचा निर्णय : दंड कमी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने गुंडाळलाप्रस्तावानुसार फेरीवाले, किरकोळ विक्रेत्यांना पहिल्या वेळेस प्लॅस्टिक आढळल्यास २०० रुपये, दुसºया वेळेस ५०० रुपये, किराणा मालाची विक्री करणाºया विक्रेत्यांना पहिल्या वेळेस ५०० रुपये, दुसºया वेळेस एक हजार रुपये, असे दंडात बदल प्रस्तावित होते.च्दूध, दही, फळे, चहा-कॉफी विक्रेत्यांना पहिल्या खेपेला ५०० रुपये, दुसºया खेपेस एक हजार रुपये, हॉटेल, मॉल व अन्य दुकानदारांना पहिल्या वेळेला एक हजार रुपये आणि दुसºया वेळेला दोन हजार रुपये दंड करावा, असे सुचवण्यात आले होते.
प्लॅस्टिकवरील कारवाईचा दंड पाच हजार रुपयेच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 3:31 AM