Join us

प्लॅस्टिकचा कचरा अडवितो पाण्याची वाट, मुंबईत प्लॅस्टिक बंदीचा पालिकेचा पुनर्विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 2:22 AM

प्लॅस्टिकच्या कच-याने नाल्यांचे तोंड दाबून १२ वर्षांपूर्वी मुंबईत पूर आणला होता. यानंतर, अनेक उपाययोजना, करोडो रुपयांचे प्रकल्प आणि जनजागृती करूनही, मुंबईची परिस्थिती जैसे थेच असल्याचे पुन्हा समोर आले.

मुंबई : प्लॅस्टिकच्या कच-याने नाल्यांचे तोंड दाबून १२ वर्षांपूर्वी मुंबईत पूर आणला होता. यानंतर, अनेक उपाययोजना, करोडो रुपयांचे प्रकल्प आणि जनजागृती करूनही, मुंबईची परिस्थिती जैसे थेच असल्याचे पुन्हा समोर आले. नाले, गटार व पंपिंग स्टेशनच्या सफाईतून पालिका कर्मचा-यांनी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा बाहेर काढला. याची गंभीर दखल घेत, प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणण्याचा तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.२००७ मध्ये प्लॅस्टिकच्या वापरावर सरसकट बंदी आणण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा चर्चेत आला. प्लॅस्टिकवरील बंदी यशस्वी करणाºया समिला शहराचा दौराही पालिका अधिकाºयांनी केला. याबाबतचा प्रस्ताव पुढे राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, प्लॅस्टिकचा उपद्रव सुरू राहिला, तरी कालांतराने प्लॅस्टिक बंदीची चर्चा बारगळली. दरम्यान, २९ आॅगस्ट आणि मंगळवारपासून कोेसळणाºया मुसळधार पावसाने, प्लॅस्टिकचा धोका पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक भागांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी, पालिकेचे ३५ हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. मात्र, प्लॅस्टिकचा कचरा पाणी वाहून नेण्याच्या मार्गात मोठा अडथळा ठरत असल्याचे आढळून आले. या कर्मचाºयांनी नाले व गटाराच्या तोंडावरील कचरा काढून, पावसाच्या पाण्याची वाट मोकळी करून दिली. पावसाळ्यात डोकेदुखी ठरणाºया प्लॅस्टिकचा बंदोबस्त करण्यासाठी पालिका आयुक्त अजय मेहता लवकरच धोरण आखणार असल्याचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.>कालांतराने प्लॉस्टिक बंदी बारगळली२००७ मध्ये प्लॅस्टिकच्या वापरावर सरसकट बंदी आणण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा चर्चेत आला. याबाबतचा प्रस्ताव पुढे राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, प्लॅस्टिकचा उपद्रव सुरू राहिला, तरी कालांतराने प्लॅस्टिक बंदीची चर्चा बारगळली.