Join us

प्लॅस्टिकपासून होऊ शकते पक्क्या रस्त्यांची निर्मिती, संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 3:19 AM

खाद्य तेलापासून बायोडिझेल : राष्ट्रीय पातळीवर निवड

मुंबई : ऑक्सिजनविरहित खोलीत प्लॅस्टिक वितळले तर प्रदूषण होत नाही तसेच उच्च पातळीवरील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास प्लॅस्टिकपासून पक्क्या रस्त्याची निर्मिती होऊ शकेल, असे निष्कर्ष देणारा जोगेश्वरीच्या अरविंद गंडभीर शाळेचा प्रकल्प राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय पातळीसाठी निवडला गेला आहे. २७ ते ३१ डिसेंबरदरम्यान भुवनेश्वर येथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेसाठी मुंबईच्या आणखी ७ विज्ञान संशोधन प्रकल्पांची निवड झाली आहे. त्यांचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून नुकतेच करण्यात आले.

सद्यपरिस्थितीतील व भविष्यातील प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन त्यावर प्लॅस्टिक आणि टेट्रापॅकचा पुनर्वापर योजनांचा अवलंब करणे हा या गंडभीर शाळेने सादर केलेल्या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. पर्यावरणाची प्लॅस्टिकपासून होणारी हानी टाळणे हा या प्रकल्पामागचा आणखी एक उद्देश असल्याचे प्रकल्पाच्या मार्गदर्शक शिक्षिका विद्या रानडे यांनी सांगितले. प्लॅस्टिक व टेट्रापॅकच्या पुनर्वापराचा तुलनात्मक अभ्यास या प्रकल्पावर काम करण्याची संधी मला मिळाली. मात्र यातून माझा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागला, अशी प्रतिक्रिया या प्रकल्पाची गटप्रमुख असलेल्या गुंजन सागवेकर हिने दिली. मूलभूत विज्ञान संशोधन, संरक्षण, कृषी, पर्यावरण , वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि उद्योगधंदे या सर्वच क्षेत्रांत शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ अशा कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. उद्याचे प्रतिभासंपन्न शास्त्रज्ञ घडविण्याचे सामर्थ्य या बाल विज्ञान परिषदेत आहे; कारण हे प्रकल्प करताना विद्यार्थी विज्ञानाचे तंत्रज्ञानात रूपांतर करण्यासाठी कित्येक महिने अथक संशोधनाचे काम करीत असल्याची प्रतिक्रिया बाल विज्ञान परिषदेचे मुंबई अध्यक्ष बी. बी. जाधव यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना वाव दिल्यास अधिक चांगली निर्मिती होऊ शकते, असेही मान्यवरांचे म्हणणे होते़पेट्रोलला सक्षम पर्याय बायोडिझेलकाही आंतरराष्ट्रीय कारणांमुळे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होत आहे. अशी परिस्थिती असताना बायोडिझेल हा यावर पर्याय ठरू शकतो. यामधूनच वापरलेल्या जेवणाच्या तेलाचा वापर करून बायोडिझेल बनविण्याचा प्रकल्प सायनच्या साधना विद्यालयाने सादर केला आहे. अनेक जनरेटर्स आणि स्टोव्ह यांमध्ये बायोडिझेलच्या वापर इंधन म्हणून होऊ शकतो. अनेक दुकानदारांकडून वेस्ट प्रोडक्ट म्हणून टाकून दिले जाणारे तेल वापरून या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पासाठी तेल गोळा केले असल्याची माहिती देण्यात आली. पेट्रोलला सक्षम पर्याय उभा करणे हा या प्रकल्पामागचा मूळ उद्देश आहे.च्या वर्षी मुंबईतून या स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर २५१ प्रकल्प सहभागी झाले होते. त्यांचे चाळणी परीक्षण विद्यानिधी हायस्कूल, जुहू या ठिकाणी करून ११० प्रकल्पांची निवड जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी झाली होती. त्यातून २० प्रकल्पांची निवड राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी करण्यात आली.च्यामधून संपूर्ण राज्यातून १५३ प्रकल्प निवडले गेले होते. येथे राज्य स्तरासाठी ७३ प्रकल्प निवडले गेले. या ७३ प्रकल्पांमध्ये मुंबईचे १४ प्रकल्प होते. या १४ प्रकल्पांपैकी एकूण ८ प्रकल्पांनी बाजी मारली आणि त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर करण्यात आली आहे.च्हे प्रकल्प भुवनेश्वर येथे २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणाºया राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत सहभागी होणार आहेत, असे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :प्लॅस्टिक बंदीरस्ते वाहतूकमुंबई