मुंबई - मध्य रेल्वेनेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने डिसेंबर २०२४ मध्ये हे काम पूर्ण करण्याचा मुहूर्त हुकला आहे. सध्या येथील पायलिंगचे काम सुरू असून मार्च किंवा एप्रिलमध्ये हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आता अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
हे प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. येथील पायलिंगचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केल्यानंतर मुख्य कामे हाती घेतली जातील. त्यामुळे एक्स्प्रेसमधून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता सरासरी २० टक्क्यांनी वाढणार मध्य रेल्वेने सर्वप्रथम हे काम ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु हे काम संथगतीने सुरू राहिल्याने नवीन वर्ष उजाडले तरी ते पूर्ण झालेले नाही.
असा आहे विस्तारीकरण प्रकल्प पूर्वीची अंतिम मुदत डिसेंबर २०२४सध्याची अंतिम मुदत एप्रिल २०२५पायलिंगचे काम पूर्ण झाले फेब्रुवारी २०२५प्रस्तावित लांबी ३०५ ते ३८२ मीटर
अधिक प्रवासी नेण्यास मदत होईल : यार्डच्या पुनर्बांधणीसह आणि इतर सुविधांच्या बांधकामासह, या प्लॅटफॉर्मची प्रस्तावित लांबी ३०५ ते ३८२ मीटर आहे. विस्तारीकरणानंतर या फ्लॅटफॉर्मवरून १८ ऐवजी २४ डब्यांच्या एक्स्प्रेस चालविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेसमधून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता सरासरी २० टक्क्यांनी वाढणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.