एलटीटी स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट बंद; नि:शुल्क पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:10 AM2021-08-25T04:10:53+5:302021-08-25T04:10:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. आता संचारबंदीत शिथिलता मिळाल्याने १६ जूनपासून हे तिकीट पुन्हा १० रुपयांचेच करण्यात आले होते. लोकमान्य टिळक स्थानकात गर्दी होत आहे. दोन महिन्यांपासून तिकीट बंद करण्यात आले आहे. पार्किंगचे दर ‘जैसे थे’ आहेत. सध्या निविदा प्रक्रिया बाकी असल्याने नि:शुल्क पार्किंग दिली जात आहे.
कोरोनाच्या काळात रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी व्हावी यासाठी प्लॅटफार्म तिकिटासाठी ११ मार्चपासून ५० रुपये मोजावे लागत होते. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाविषयी सामान्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर चार महिन्यांनंतर प्लॅटफार्म तिकिटासाठी पुन्हा १० रुपयेच द्यावे लागतील. महागड्या तिकिटामुळे रेल्वे फलाटावर जाण्याऐवजी बाहेरूनच नातेवाईक, आप्तांना निरोप दिला जात होता. नंतर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी झाल्याने फलाटावर प्रवाशांएवढीच त्यांना सोडणाऱ्या आप्तांची गर्दी होत होती. तेव्हापासून प्लॅटफॉर्म तिकीट बंद करण्यात आले आहे.
----
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफाॅर्मचे तिकीट दर ५० रुपये करण्यात आले होते. कोरोना रुग्ण संख्येत घट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता १६ जूनपासून पुन्हा १० रुपये घेण्यात येत आहेत. काही करणास्तव उपनगरीय रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट दिले जात नाही, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
----
काय होते पार्किंगचे दर
कालावधी - सायकल -दुचाकी - कार - रिक्षा
२ तास पर्यंत -५-१०-२०-१५
२ ते ६ तास -१०-२०-४०-३०
६ ते १२ तास -१५-३०-८०-४०
१२ तासापेक्षा जास्त -२०-४०-१००-५०
मासिक -२००- ४००-९००- ६००
---