Platform ticket rates hike:गर्दी टाळण्यासाठी रेल्वेची शक्कल; मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 08:21 PM2021-10-07T20:21:16+5:302021-10-07T20:46:11+5:30

platform ticket rates hike in Mumbai: या रेल्वे स्थानकांवर गर्दीचे प्रमाण खूप आहे. सणासुदीच्या काळात ते आणखी वाढते. नातेवाईकांना सोडण्यास आलेले नागरिक प्लॅटफॉर्मवर येतात.

platform ticket rates hike by five times in major stations on Mumbai Division | Platform ticket rates hike:गर्दी टाळण्यासाठी रेल्वेची शक्कल; मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पटीने वाढ

Platform ticket rates hike:गर्दी टाळण्यासाठी रेल्वेची शक्कल; मुंबईत प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पटीने वाढ

googlenewsNext

कोरोना काळात रेल्वे स्थानकांवर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर उद्यापासून प्लॅटफॉर्म तिकिट आकारण्यात येणार आहे. हा तिकिट (platform ticket) दर पाचपटीने वाढविण्यात आला आहे. यामुळे नातेवाईकांना निरोप देण्यासाठी येणाऱ्यांच्या गर्दीला चाप बसणार आहे. 

मुंबईत सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर हा 10 रुपये आहे. सीएसएमटी, एलटीटी, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल स्थानकावर हा दर उद्यापासून 50 रुपये करण्यात (rates hike in Mumbai) आला आहे. हे नवे प्लॅटफॉर्म तिकीट दर 8 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. पुढील सूचना येईपर्यंत हे दर राहणार आहेत.

या रेल्वे स्थानकांवर गर्दीचे प्रमाण खूप आहे. सणासुदीच्या काळात ते आणखी वाढते. नातेवाईकांना सोडण्यास आलेले नागरिक प्लॅटफॉर्मवर येतात. यामुळे ही गर्दी आणखी वाढते. ही गर्दी कमी करण्यासाठी तसेच कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. 
 

Web Title: platform ticket rates hike by five times in major stations on Mumbai Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.