मुंबई : मालाड येथे प्लॅस्टिकबंदी संदर्भात पालिका व व्यापा-यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. या बैठकीमुळे प्लॅस्टिकबंदी संदर्भात येथील व्यापा-यांच्या मनातील भीती झाली दूर झाली आहे. २३ जून रोजी राज्यात शासनाने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे मालाड येथील व्यापाºयांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. सुमारे अडीच दिवस येथील ४०० व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली होती आणि सहायक पालिका आयुक्तांना निवेदन दिले होते.एकता नमकीन असोसिएशनच्या वतीने प्लॅस्टिकबंदी संदर्भात व्यापाºयांच्या मनात असणारी भीती दूर करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या पी-उत्तर विभागाचे दुकाने व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी सुनील लाड व अधिकारी, तसेच दिंडोशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश राणे व मालाडमधील व्यापाºयांची ही संयुक्त बैठक मालाड (पूर्व) येथील तेरापंथ हॉल, दप्तरी रोड येथे झाली. बैठकीचे नेतृत्व असोसिएशचे सचिव नामदेव झिंगाडे यांनी केले.या वेळी पालिका अधिकाºयांनी व्यापाºयांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. व्यापाºयांनी प्लॅस्टिकबंदीचे स्वागत करावे. कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरावे व कोणते वापरू नये, या संदर्भात व्यापाºयांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित व्यापाºयांनी प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतली.पावसाचा विचार करता आणि जोपर्यंत प्लॅस्टिक उत्पादकांकडे ५० मायक्रॉनहून अधिक जाडीची पिशवी आहे, तोपर्यंत व्यापाºयांना ही पिशवी देता येईल. त्या पिशवीवर संबंधित उत्पादकाचे नाव, परवाना नंबर आणि ती पिशवी रिसायकलिंग होईल, असे नमूद केलेली पिशवी व्यापाºयांना वापरण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, त्यात ही अट आहे की, ग्राहकांकडून ती पिशवी पुन्हा व्यापाºयांनी मागवून घ्यावी. अशा पिशव्या उत्पादकांना परत द्याव्यात, जेणेकरून त्या पुन्हा प्रवाहात येतील. व्यापाºयांनी ही अट मान्य केली. त्याचबरोबर, प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर प्लॅस्टिक पिशवीसाठी डबा ठेवण्याचे ठरविले आहे.या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष अंबालाल पटेल, मनसे शाखा अध्यक्ष प्रशांत महाडिक, सावजीभाई सत्रा यांचे सहकार्य लाभले.- २३ जून रोजी राज्यात शासनाने लागू केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे मालाड येथील व्यापाºयांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. सुमारे अडीच दिवस येथील ४०० व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवली होती.या पार्श्वभूमीवर एकता नमकीन असोसिएशनच्या वतीने प्लॅस्टिकबंदी संदर्भात व्यापाºयांच्या मनात असणारी भीती दूर करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक वापरावे व कोणते वापरू नये, या संदर्भात पालिका अधिकाºयांनी व्यापाºयांना मार्गदर्शन केले.
व्यापारी-पालिका अधिकाऱ्यांची प्लॅस्टिकबंदीबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 3:52 AM