मुलांशी खेळा; त्यांच्या जीवनाशी नको
By admin | Published: February 10, 2016 04:16 AM2016-02-10T04:16:24+5:302016-02-10T04:16:24+5:30
अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून जनजागृती सुरू केली आहे. मुलांशी खेळा
मुंबई : अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून जनजागृती सुरू केली आहे. मुलांशी खेळा, त्यांच्या जीवनाशी नाही, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. ‘विकृत वृत्तींना आळा घालून मुलांच्या भविष्याची काळजी घ्यावी,’ असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर यांनी स्वत:च्या टिष्ट्वटर अकाउंटवरूनही केले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या वर्षभरात ४४७ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. त्यातील ४०० मुली अद्यापही बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीतून उघड झाली आहे. शहरातील चेंबूर, गोवंडी, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर अशा झोपडपट्ट्यांतील लहान मुलांवर अत्याचारांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये यात तिप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हे चिमुकले गुन्हेगारांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत.
मुंबईत दिवसाला सरासरी दोन ते तीन मुले बेपत्ता होतात. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुले घर सोडतात, काही प्रेमकरणातून पळून जातात, काहींचे खंडणीसाठी अपहरण होते. आठ ते दहा वर्षे वयोगटातील मुलांचे विकृत वृत्तीच्या व्यक्ती अपहरण करतात. मूल न होणाऱ्यांना अवैधपणे विक्रीसाठी, भीक मागण्यासाठी अपहरण होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलांसंदर्भातील गुन्हे
अपहरण
वर्ष दाखलउघड
२०१४ ९२२ ५२२
२०१५ २७९१३९
बलात्कार
वर्षदाखलउघड
२०१४ ४४७ ४२३
२०१५ ३५०३२०