जुन्या नोटांवर चालणार नाटक!
By admin | Published: November 16, 2016 05:21 AM2016-11-16T05:21:43+5:302016-11-16T05:21:43+5:30
नाट्यगृहाचे भाडे भरण्यासाठी चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती
Next
मुंबई : नाट्यगृहाचे भाडे भरण्यासाठी चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व सचिव संतोष काणेकर यांनी मंगळवारी सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. . ज्याप्रमाणे महापालिका व नगरपालिकांना कर रक्कमेची देयके स्वीकारण्यासाठी जुन्या नोटांची सवलत दिली आहे, तश्याच प्रकारची सवलत नाट्यनिर्मात्यांना दिल्यास मराठी नाटकांना दिलासा मिळू शकेल, अशी विनंती कांबळी यांनी केली होती. (प्रतिनिधी)