मुंबई : नाट्यगृहाचे भाडे भरण्यासाठी चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली. मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व सचिव संतोष काणेकर यांनी मंगळवारी सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. . ज्याप्रमाणे महापालिका व नगरपालिकांना कर रक्कमेची देयके स्वीकारण्यासाठी जुन्या नोटांची सवलत दिली आहे, तश्याच प्रकारची सवलत नाट्यनिर्मात्यांना दिल्यास मराठी नाटकांना दिलासा मिळू शकेल, अशी विनंती कांबळी यांनी केली होती. (प्रतिनिधी)
जुन्या नोटांवर चालणार नाटक!
By admin | Published: November 16, 2016 5:21 AM