Join us

नाट्यदिग्दर्शक रमाकांत वैद्य काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 5:38 AM

मेट्रो-३ चे प्रमुख जनसंपर्क सल्लागार नीलय वैद्य यांचे वडील व बहुरूपी नाट्यसंस्थेचे सदस्य व दिग्दर्शक रमाकांत गजानन वैद्य यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने ठाण्यातील गोडबोले हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

मुंबई : मेट्रो-३ चे प्रमुख जनसंपर्क सल्लागार नीलय वैद्य यांचे वडील व बहुरूपी नाट्यसंस्थेचे सदस्य व दिग्दर्शक रमाकांत गजानन वैद्य यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने ठाण्यातील गोडबोले हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पवन, नीलय ही दोन मुले, सुना, नातवंडे अंसा परिवार आहे.प्रसिद्ध अभिनेते - शास्त्रज्ञ डॉ. हेमू अधिकारी यांनी स्थापन केलेल्या बहुरूपी नाट्यसंस्थेचे रमाकांत वैद्य हे सुरुवातीपासूनच सदस्य होते. ‘हे समय’, ‘उत्काल समय’, ‘अपत्य’, ‘साष्टांग नमस्कार’, ‘काका किश्याचा’ अशा दर्जेदार नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. बीएससी इंजिनीअर असलेले वैद्य हे व्यवसायाने रबर तंत्रज्ञ होते. शनिवारी २३ जूनला सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान दादरच्या शिवाजी पार्क येथील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

टॅग्स :मुंबई