ट्रायने दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीविरोधात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:25 AM2018-12-25T06:25:36+5:302018-12-25T06:25:52+5:30

दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नवीन नियमानुसार, २९ डिसेंबरपर्यंत ग्राहकांना आवडीच्या वाहिन्यांची नावे केबल चालकांना कळविणे गरजेचे आहे.

Plea against the implementation of the judgment given by TRAI | ट्रायने दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीविरोधात याचिका

ट्रायने दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीविरोधात याचिका

Next

मुंबई : दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नवीन नियमानुसार, २९ डिसेंबरपर्यंत ग्राहकांना आवडीच्या वाहिन्यांची नावे केबल चालकांना कळविणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार, केबल व्यावसायिकांना वाहिन्या दाखवाव्या लागतील. मात्र, याच्या अंमलबजावणीसाठी पुरेशी तयारी झाली नसल्याने, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. यावर २६ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ट्रायने पुरेशी तयारी केलेली नाही. ट्रायने यासंदर्भात १० डिसेंबरला मुंबईतील केबल व्यावसायिकांसोबत बैठक घेतली. त्या वेळी केबल व्यावसायिकांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत अद्याप त्यांनी कुठलाच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे केबल व्यावसायिकांच्या वतीने प्राची लिमये, अरुण सिंग, मंगेश वाळंज, प्रवीण पटेल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची नावे अद्याप केबल व्यावसायिकांना सांगितलेली नाहीत. याबाबतचा अर्ज मल्टी सर्व्हिसेस आॅपरेटर (एमएसओ)कडून ग्राहकांसाठी देण्याची गरज होती. मात्र, अद्याप तो दिलेला नाही. एमएसओ व केबल व्यावसायिकांमध्ये याबाबत आवश्यक करार अद्याप झालेला नाही. त्यामुळे पसंतीच्या वाहिन्या दाखविण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे शिव केबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी सांगितले. एमएसओ व ट्रायची पुरेशी तयारी झालेली नसल्याने, २९ डिसेंबरला ब्लॅकआउट होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

पसंतीच्या वाहिन्या दाखविण्यात अडचणी

ग्राहकांनी आवडीच्या वाहिन्यांची नावे कळवली नाहीत. याबाबतचा अर्ज मल्टी सर्व्हिसेस आॅपरेटर (एमएसओ) ने ग्राहकांना दिला नाही. एमएसओ, केबल व्यावसायिकांत करार झालेला नाही. त्यामुळे पसंतीच्या वाहिन्या दाखविण्यात तांत्रिक अडचणी असल्याचे शिव केबल सेनेचे सरचिटणीस राजू पाटील म्हणाले.

Web Title: Plea against the implementation of the judgment given by TRAI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत