Join us

नारायण राणेंच्या जुहूतील बंगल्याविरोधात हायकोर्टात याचिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:59 PM

या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्यामुळे राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयाचिकाकर्ते प्रदीप भालेकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून नारायण राणे यांनी जुहू येथे २०११ मध्ये या बंगल्याच्या बांधकामास सुरुवात केली.हे काम २०१२ मध्ये पूर्ण झाले असून हा ७ मजली बंगला 'अधिश' नावानं ओळखला जातो.

मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा जुहू येथील 'अधिश' बंगला अनधिकृत असून तो पाडण्यासंदर्भातची याचिका मुंबई हायकोर्टात नुकतीच दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्यामुळे राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

याचिकाकर्ते प्रदीप भालेकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. सीआरझेड-2 कायद्यानुसार समुद्रापासून ५० मीटरच्या आत कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येत नाही. त्यामुळे सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून नारायण राणे यांनी जुहू येथे २०११ मध्ये या बंगल्याच्या बांधकामास सुरुवात केली. हे काम २०१२ मध्ये पूर्ण झाले. आता  हा ७ मजली बंगला 'अधिश' नावानं ओळखला जातो. दरम्यान, या बंगल्यामुळे नारायण राणे यांनी सीआरझेड-2 चं उल्लंघन केल्याचा आरोप करत याचिकाकर्ते प्रदीप भालेकर यांनी याप्रकरणी पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र, पालिकेकडून याप्रकरणी टोलवाटोलवीची उत्तरं मिळाल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील नितीन सातपुते यांनी दिली आहे. वेगवेगळी आणि टोलवाटोलवीची उत्तरं पालिकेकडून मिळत असल्यानं अखेर भालेकर यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. 

टॅग्स :नारायण राणेन्यायालयउच्च न्यायालय