कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 09:31 AM2020-07-25T09:31:09+5:302020-07-25T10:21:55+5:30
Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut: डब्ल्यूएचओ आणि वॉशिंग्टन पोस्ट यासारख्यांनी आपल्या कामाची नोंद घेणे ही फार मोठी गोष्ट आहे. यामुळे मी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही
मुंबई – देशात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतायेत, जवळपास १० लाखांच्या वर बाधितांचा आकडा गेला आहे. राज्यात ३ लाखांच्या आसपास कोरोना रुग्णांची संख्या आहे. मात्र ३ लाख हा एकूण म्हणजे पहिला रुग्ण जो बरा होऊन घरी गेला आहे, त्यालासुद्धा त्यात पकडलं जातंय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले, कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवली जातेय या विरोधकांच्या आरोपाला त्यांनी उत्तर दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जे रुग्ण कोरोनातून बरे झालेत यात त्यांचा आकडा धरता कामा नये, महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि देशाला पंतप्रधान किती असे विचारता का? मग नेहरुंपासून पंतप्रधान धरणार का? राज्यात यशवंतरावांपासून मुख्यमंत्री धरणार का? असे सगळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान एकत्रित धरत नाहीत. पण आता किती मुख्यमंत्री...एक, यात एकच नाव यायला हवं. कोरोना रुग्णांचा आकडाही कमीच आहे, अगदीच कमी झालाय असेही नाही. कारण काही ठिकाणी संसर्ग वाढतोय, आकडा वाढतोय, पण लवकरात लवकर तो रुग्ण ओळखून त्याला बरं करणे हे महत्त्वाचे आहे असं ते म्हणाले.(Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
तसेच मुंबईत कोरोना नियंत्रणात येतोय याबद्दल इतक्यातच काही बोलणार नाही, मला घाईघाईने काही स्टेटमेंट द्यायचं नाही, मुंबई आकडा कमी होतोय असा जर समज करुन घेतला तर आपण गाफील राहू, त्याचीच मला काळजी वाटते, त्यामुळे कृपा करुन तुम्ही त्या आकड्यांकडे लक्ष देऊ नका अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुलाखतीदरम्यान केली. त्याचसोबतच डब्ल्यूएचओने धारावीचा उल्लेख केला, अलीकडे वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख आलाय त्यांनी म्हटलंय की, मुंबई हे एक असं शहर आहे ज्या शहराने कोणतीही माहिती लपवलेली नाही. लपवाछपवी नाही, हे आहे ते स्पष्ट आहे असा दावाही त्यांनी केला.
मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं
दरम्यान, मुंबईत कोरोना मृत्यूचे आकडे लपवले जात आहेत असा आरोप विरोधकांकडून केला जातो त्यावर त्यांच्याकडे वॉशिंग्टन पोस्ट वैगेरे येत नसेल, आता वॉशिंग्टन पोस्टही आम्ही मॅनेज केलंय तर. डब्ल्यूएचओ आणि वॉशिंग्टन पोस्ट यासारख्यांनी आपल्या कामाची नोंद घेणे ही फार मोठी गोष्ट आहे. यामुळे मी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.(Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
पाहा व्हिडीओ