हुतात्मा स्मारकाच्या साक्षीने पारदर्शकतेची शपथ
By admin | Published: February 5, 2017 04:27 AM2017-02-05T04:27:16+5:302017-02-05T04:27:16+5:30
हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून भाजपाचे सगळे उमेदवार पारदर्शकतेची व मुंबई महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याची शपथ रविवारी घेतील. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे
मुंबई : हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून भाजपाचे सगळे उमेदवार पारदर्शकतेची व मुंबई महापालिकेत भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याची शपथ रविवारी घेतील. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे असावेत,
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनतेची मते सोमवारी जाणून
घेणार आहेत. त्यासाठी ते आॅनलाइन संवाद साधणार आहेत.
जाहीरनाम्यात कुठली आश्वासने असावीत यासाठी मुख्यमंत्र्यांनी
सोशल मीडियातून आवाहन केले
होते. नागरिकांकडून तब्बल
सहा लाख सूचना आल्या.
या सूचनांची छाननी करून जाहीरनाम्यात त्यांचा समावेश
केला जाईल, असे मुंबई
भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी पत्र परिषदेत सांगितले. (विशेष प्रतिनिधी)