सुधाकर वाघ ल्ल धसईभारतीय १९४३ च्या चलेजाव स्वातंत्र्यलढ्यातील क्ररांतीवीर भाई कोतवाल यांना एका फितुराने इंग्रज पोलीसांना दिलेल्या माहीतीवरु न ब्रिटीश पोलीस अधिकारी हॉल स्वत: जातीने १०० सशस्त्र पोलीस शिपायांना घेऊन सिद्धगडावर पोहचला . पोलीसांनी केलेल्या गोळीबारात कोतवाल यांना गोळी लागली त्यांच्या बरोबर हिराजी पाटील यांनाही हौतात्म्य लाभले. मुरबाड तालुक्याच्या इतिहासाचे रक्तरंजीत पान ठरलेल्या आणि हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या सिद्धगडच्या ठिकाणीअनेक देशप्रेमी नतमस्तक होण्यासाठी गर्दी करतात.मात्र रस्त्याची दुरवस्था असल्याने ते नाराजी व्यक्त करतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथम साने गुरु जींनी या ठिकाणी हुतात्मा स्मारकावर दिवा लावला. त्या दिवसापासून दरवर्षी येथे १ जानेवारीला संध्याकाळीपासून मुरबाड,कर्जत, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण अशा अनेक तालुक्यातील देशप्रेमी लोक, महाविद्यालÞीन विद्यार्थी, प्राथमिक शाळांतील विद्यार्थी, तरु ण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्र म करून २ जानेवारीलापहाटे ६ वाजून १० मिनीटांनी क्र ांतीज्योत पेटवतात. केवळ फंदफितुरीने २ जानेवारी १९४३ रोजी इंग्रजांच्या जाळ्यात अडकून अवघ्या ३१ व्या वर्षी हुतात्म्य मिळालेला तेजपुंज तारा म्हणजे विठ्ठलराव लक्ष्मणराव उर्फ भाई कोतवाल यांचे स्मारक सिद्धगडाच्या पायथ्याशी आहे. या ठिकाणी मुरबाडहून म्हसामार्गे जांभुर्डे गावावरु न सिद्धगडच्या पायथ्याशी बोरवाडी येथे जाता येते. जांभुर्डे गावापासून हे स्फूर्तीस्थान ९ कि.मी.अंतरावर आहे.मात्र हा परीसर भिमाशंकर अभयारण्यात मोडत असल्याने वनखात्याच्या जाचक अटीमुळे पूर्णपणे दुर्लक्षीत राहीला आहे. हुतात्म्यांच्या बलिदानाला ७० वर्षे उलटून गेली़ परंतु या स्मारकाकडे जाण्यासाठी नीट डांबरी रस्ता नाही. दरवर्षी अनेक राजकीय नेते ,मंत्री महोदय येतात अश्वासने देतात.परंतुनंतर त्या स्मारकाकडे कुणीच फिरकत नसल्याचे स्थानिक आदिवासी सांगतात. या ठिकाणी पाणी, वीज नसल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागतो. पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी हा रस्ता खचुन जातो.मात्र फक्त २ जानेवरीलाच शासनाला जाग येते व या रस्त्याची कशीबीशी माती भराव घालून डागडुजी करतात.जिल्हापरीषद बांधकाम विभागामार्फत वर्षातून एकदा तात्पुरती डागडुजी केली जाते.शासन या स्मारकाचा रस्त्याला झळाळी देईल तरी कधी असा सवाल लोक करीत आहेत. सिद्धगड स्मारकाला गेली सात वर्ष झाली आहेत शासनाने दोन लाख रु पये निधी दिला होता. यावर्षी रस्त्याला काहीच निधी शासनाकडून मिळाला नाही. - व्ही.एम.धात्रक, शाखा अभियंता जि.प.बांधकाम मुरबाड.हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारकाच्या विकासाठी शासनाने वनविभागाच्या जाचक अटी शिथील करून या पर्यटन स्थळाचा विकास केला पाहीजे. - रामभाऊ दळवी, सदस्य, वीर हुतात्मा स्मारक समिती, मुरबाड
हुतात्मा भाई कोतवाल स्मारकाची दुर्दशा
By admin | Published: January 01, 2015 11:19 PM