सरकारच्या दुर्लक्षामुळे कोकणी माणसाचे हाल; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 02:30 AM2020-08-18T02:30:18+5:302020-08-18T02:30:22+5:30
या टोलमाफीचा कोणता फायदा कोकणात जाणाºया माणसांना मिळाला, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
मुंबई : राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
दरेकर म्हणाले की, कोकणात जाणाºया लोकांना विलगीकरण काळासाठी १२ आॅगस्टपूर्वी पोहोचावे असे सरकारने सांगितले. त्यामुळे अडीच हजार रुपयांची कोविड चाचणी करत आणि आर्थिक भुर्दंड सोसत, बहुसंख्य चाकरमानी कोकणात पोहोचले. बहुसंख्य चाकरमानी १२ आॅगस्टपर्यंत खासगी वाहनांनी आपापल्या गावी दाखल झाले. त्यानंतर १३ तारखेला सरकारने टोलमाफी जाहीर केली. या टोलमाफीचा कोणता फायदा कोकणात जाणाºया माणसांना मिळाला, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.
गणेशोत्सवाकरिता यंदा सुमारे ३ लाख चाकरमानी कोकणात गेले, कोविड तपासणीचा भुर्दंड आणि प्रवासाचा खर्च मिळून प्रत्येकामागे ३ हजार रुपये गृहीत धरले तर सरकारला १०० कोटी रुपये खर्च आला असता, ज्या कोकणाने शिवसेनेला व सरकारला भरभरून दिले त्या सरकारला कोकणातील चाकरमान्यांसाठी २०० कोटी रुपयांचा छोटासा आर्थिक भार सोसता आला नाही, हे कोकणवासीयांसाठी दुर्दैवी आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून चाकरमान्यांनी शिवसेनेला भरभरून प्रतिसाद दिला, त्याच कोकणाला शिवसेनेने सापत्नपणाची वागणूक दिल्याचे दरेकर म्हणाले.
>च्रेल्वेने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर उशिराने परवानगी दिली गेली. परंतु विलगीकरणाच्या अटीमुळे बहुतांश लोकांनी आर्थिक भुर्दंड सहन करत खासगी वाहनाने आधीच गाव गाठले.
च्परिणामी रेल्वेगाड्यांमध्ये सरासरी फक्त ८० प्रवासी कोकणात गेले.