नायर दंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हाल ; निवासी डॉक्टरांचे रुग्णालयात काम बंद आंदोलन

By संतोष आंधळे | Published: April 15, 2024 08:34 PM2024-04-15T20:34:18+5:302024-04-15T20:34:33+5:30

काही दिवसापूर्वी लागलेल्या या आगीत काही खोल्या आणि वस्तू जळून खाक झाल्या होत्या.

Plight of students in Nair Dental College; | नायर दंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हाल ; निवासी डॉक्टरांचे रुग्णालयात काम बंद आंदोलन

नायर दंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हाल ; निवासी डॉक्टरांचे रुग्णालयात काम बंद आंदोलन

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायर दंत रुग्णलयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन केले होते. मत त्यानंतर काही दिवसापूर्वीच त्या इमारतीत विद्यार्थ्यंसाठी असणाऱ्या वसतिगृहाच्या माळ्यावर आग लागली होती. त्यामुळे रिपेरिंगच्या कामा निमित्ताने गेले काही दिवस या विदयार्थ्यांच्या वसतिगृहातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप हाल होत होते. वसतिगृहात विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत निवासी डॉक्टरांनी सोमवारी अचानक काही काळ काम बंद केले होते.    

काही दिवसापूर्वी लागलेल्या या आगीत काही खोल्या आणि वस्तू जळून खाक झाल्या होत्या. एका बाजूला शहारत तापमान वाढत असताना विध्यार्थ्यांच्या वसतिगृहातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्यांचे दिवसभर हाल होत होते. त्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये अनेक दिवस पुरवठा सुरळीत कधी पूर्ववत होणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र प्रशासनाने या गोष्टीकडे फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. सोमवारी अचानक या नवीन इमारतीतील वसतिगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टर आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडे विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत काही काळ अचानक काम बंद केले होते. त्यामुळे काही काळ रुग्णलयात गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्मण झाली होती.

नायर दंत रुग्णालयात मुंबईच्या विविध भागातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. कारण महापालिकेचे हे एकमेव रुग्णालय असून या ठिकाणी दंत उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी सोमवारी अचानक काही निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले. मात्र रुग्णालयात उपस्थित असणाऱ्या इतर प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांनी रुग्णांना उपचार दिले. त्यामुळे रुग्णसेवेत फार बाधा निर्माण झाली नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.  
       
आदित्य ठाकरे यांची समाजमाध्यमांवर बोचरी टीका

नायर दंत रुग्णालयातील विद्यार्थ्यांचे हाल आणि काम बंद आंदोलन याचा धागा पकडून सोमवारी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी त्यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांना १० दिवस वीज आणि पाणी नसल्याचे सांगून काही प्रश्न उपस्थित केले आहे. या इमारतीत काही खोल्या जाळून खाक झाल्या आहेत. त्या ठिकाणी अग्निप्रतिबंध सुरक्षा प्रणालीचे नियम पाळले गेले आहे का ? हा आणि अन्य काही प्रश्न विचारले आहेत. तसेच या ठिकाणच्या कॅन्टीन मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला आहे.  
 
काही दिवसापूर्वी नवीन इमारतीत आग लागल्यामुळे इलेक्ट्रीसिटीचे काम सुरु होते. मात्र ते काम पूर्ण होऊन आता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात पुन्हा विद्यूत पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आला आहे. काही वेळ विद्यार्थ्यांनी काम बंद केले होते. मात्र त्याचा काही परिणाम रुग्णसेवेवर झाला नाही. सर्व विद्यार्थी काही वेळेतच कामावर रुजू झाले आहेत.  आमच्या हॉस्टेलचे कॅन्टीन मधील जेवण अनेक दिवस विद्यार्थी, डॉक्टर आणि कर्मचारी खात आहे कुणाचीही काही तक्रार नाही.    
डॉ नीलम अंड्राडे, अधिष्ठाता
नायर दंत महाविद्यालय

Web Title: Plight of students in Nair Dental College;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.