दिंडोशीत महिलेला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नशेत एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न मालाड रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी करण्यात आला. याप्रकरणी अपहरणकर्त्या महिलेलाल दिंडोशी पोलिसांनी अटक केली.
मालाड रेल्वे स्थानकाजवळील झोपडपट्टी परिसरात काही लहान मुले घराबाहेर खेळत होती. त्याचदरम्यान अल्फोना सदद (३८) नावाची महिला त्याठिकाणी आली. तिने खेळणाऱ्या मुलांपैकी एका तीन वर्षांच्या मुलाला खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी त्याची बहीण तेथे आली आणि तिने आरडाओरड करत आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला पकडले आणि याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार दिंडोशी पोलीस तेथे आले आणि त्यांनी सददला ताब्यात घेतले. चाैकशीत ती घडलेल्या प्रकाराबाबत काहीच स्पष्टीकरण देऊ शकली नाही. ती नशेत असल्याचे पाेलिसांना समजले. त्यानुसार तिला अटक करण्यात आली. त्यानंतर खासगी बॉण्डवर तिची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
................................