मुंबई - माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत पोलिसांनी मोठा गौप्यस्फोट केला असून, या नक्षल समर्थकांकडून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे तसेच इतर पुरावे, प्रसारमाध्यमांसमोर सादर केले आहेत. यावेळी माओवादी थिंक टँकच्या घरी टाकण्यात आलेल्या धाडींमधून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत अटक करण्यात आलेले सर्वजण माओवादी संघटनेसाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या व्यक्तींविरोधात पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
"आम्हाला सबळ पुरावे मिळाल्यानंतरच आम्ही समाजातील या प्रस्थापित व्यक्तींविरोधात वेगवेगळ्या शहरांत छापे मारून कारवाई केली. आम्हाला मिळालेले पुरावे या व्यक्तींचे माओवाद्यांशी थेट संबंध असल्याचे दर्शवत होते," अशी माहिती या पत्रकार परिषदेवेळी महाराष्ट्र पोलिसांचे अतिरीक्त महासंचालक परमवीर सिंह यांनी सांगितले. तसेच मी 20 वर्षांपूर्वी चंद्रपूर, भंडारा येथे काम केले आहे. त्यामुळे तेव्हापासूनच शहरी नक्षलवादाबाबत मला कल्पना आहे, तसेच त्याविरोधात मी काम केले आहे असेही परमवीर सिंह यांनी स्पष्ट केले.
माओवादी थिंक टँकच्या अटकेबाबत माहिती देण्यासाठी पोलिसांनी आज मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडून देशाविरोधात कट रचला जात होता, असे पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच या संदर्भातील पुरावेही प्रसार माधमांसमोर सादर केले. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावरच ही कारवाई करण्यात आली. तसेच तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींचे काश्मीरमधील फुटीरतावादी आणि मणिपूरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली.
विविध स्तरांवरून नक्षलवादी कारवायांसाठी पैशाचा पुरवठा झाल्याची हजारो पत्रे आमच्या हाती लागली आहेत. तसेच फरार नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे आणि रोना विल्सन यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारामध्ये नक्षली कारवायांबाबत थेट उल्लेख असल्याचेही उघड झाले आहे, अशी माहितीही अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी दिली. जेएनयूमधील विद्यार्थ्यांना नक्षलवादाकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असेही तपासात उघड झाले आहे. तपासादरम्यान रोना विल्सन यांनी पासवर्ड टाकून लॉक केलेले एक पत्रही हस्तगत करण्यात आले आहे. तसेच रोना विल्यम यांनी कॉम्रेड प्रकास यांना लिहिलेल्या पत्रामधून राजीव गांधींसारखा घातपात करण्याचा आणि चार लाख राउंड, ग्रेनेड आणि 8 कोटी रुपयांचा समावेश असल्याचा उल्लेख आहे. असेही पोलिसांनी यावेळी सांगितले.
पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- 8 जानेवारीला या केस ची सुरुवात झाली- एल्गार परिषद झाली तेव्हा भाषण झाली तेव्हा गुन्हा दाखल केला होता, 5 आरोपी होते,त्यानंतर 2 नवे या समावेश करण्यात आली- छापे टाकले तेव्हा साहीत्य जमा केले होते- पंचनामा आणि व्हिडिओ ग्राफी देखील करण्यात आला होता- अधिक तपास करत होतो तेव्हा यात अनेक सहभागी आल्याचं समोर आलं- यामध्ये अजून परीक्षण केल्यानंतर माहिती पोहचवण्यासाठी कुरिअर चा वापर यामध्ये करण्यात आला- पुरावे 23 ऑगस्टला कारवाई करण्यात आली त्यावेळी 7 आरोपींची नावे समोर आली - 29 तारखेला 7 वेगवेगळ्या ठिकाणांहून काही पुरावे जप्त केले- हजारो कागदपत्रे आमच्या जवळ आहेत ते पुरावे आहेत- मिलिंद तेलतुंबडे आणि रोना विल्सन यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारामध्ये नक्षली कारवायांबाबत थेट उल्लेख- अटक करण्यात आलेल्या आरोपींचे काश्मीरमधील फुटीरतावादी आणि मणिपूरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध-