तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी

By मनीषा म्हात्रे | Published: October 14, 2024 07:53 AM2024-10-14T07:53:11+5:302024-10-14T07:54:06+5:30

आरोपींनी मुंबई-पुण्यात राहून जूनमध्ये रेकी केली आणि हत्येचा कट रचल्याचे  प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले. 

Plotted to kill Baba Siddiqui as soon as he came out of jail; Staying in Mumbai, Pune, Reiki, two and a half to three lakh betel nuts | तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी

तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी चार आरोपींची ओळख पटविण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यातील गुरमेल सिंगसह दोघांना अटक केली आहे. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणारा शिवकुमार गौतम (२४) आणि त्याचा साथीदार मोहम्मद झीशान अख्तर याच्या शोधासाठी गुन्हे शाखेची १५ पथके मुंबईबाहेर रवाना झाली आहेत. आरोपींनी मुंबई-पुण्यात राहून जूनमध्ये रेकी केली आणि हत्येचा कट रचल्याचे  प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले. 

मूळचा हरियाणाचा रहिवासी असलेला गुरमेल सिंग विरुद्ध २०१९ मध्ये हरियाणात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात अटक झाल्यानंतर तो जामिनावर सुटला. तेथे कारागृहात असताना तो लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला. तेव्हापासून तो त्यांच्यासाठी काम करत असल्याचा संशय असून गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे.  

अल्पवयीन आहे, असा दावा करणारा आरोपी शिवकुमारच्या उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील आहे. मजुरीसाठी महाराष्ट्रात जात असल्याचे सांगून शिवकुमार घरातून निघाला होता. त्यानंतर तो पुण्यात भंगारच्या दुकानात काम करू लागला. काही महिन्यांनी त्याने गावातील या तरुणालाही बोलावून घेतले. दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे.

शिवकुमार गौतम, मोहम्मद अख्तरच्या शोधासाठी पथके रवाना
सुपारी कोणी घेतली? 
या प्रकरणातील चौथा आरोपी मोहम्मद झीशान अख्तर हा लॉरेन्स बिष्णोईच्या संपर्कात होता. त्यानेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतल्याची माहिती उजेडात येत आहे. 

जूनमध्ये गुरमैलसिंग हा हरियाणाच्या कैथल कारागृहातून बाहेर पडताच झीशान अख्तरने त्याची कारागृहाबाहेर भेट घेतली. तेथून तो पुण्यात आला. 

तेथे शिवकुमार आणि स्वत:ला अल्पवयीन म्हणवून घेणाऱ्या आरोपीसह हत्येचा कट आखण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन बाबा सिद्दीकी यांची रेकी करून हत्येचा कट आखला. 

कुर्ल्यात भाड्याच्या घरात राहिले 
आरोपी जूनपासून कुर्ल्यात १४ हजार रुपयांच्या भाडे तत्त्वावरील घरात राहत होते. आरोपींना हत्येसाठी अडीच ते तीन लाखांची सुपारी मिळाली होती. ती रक्कम ते वाटून घेणार असल्याची माहिती उजेडात येत आहे.
 

Web Title: Plotted to kill Baba Siddiqui as soon as he came out of jail; Staying in Mumbai, Pune, Reiki, two and a half to three lakh betel nuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.