Join us

स्वस्त घरांच्या नावावर ग्राहकांची बिल्डरांकडून लूट

By admin | Published: November 11, 2014 10:55 PM

पनवेल परिसरात स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा:या बोगस बिल्डरांचा धंदा तेजीत आहे. पैसे घेऊन कित्येक ग्राहकांना चुना लावून बिल्डर पसार झाले आहेत.

प्रशांत शेडगे - पनवेल
पनवेल परिसरात स्वस्त दरात घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा:या बोगस बिल्डरांचा धंदा तेजीत आहे. पैसे घेऊन कित्येक ग्राहकांना चुना लावून बिल्डर पसार झाले आहेत. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारींचा पाऊस पडत आहे. एकटय़ा खांदेश्वर पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. 
पनवेल शहरालगत नेरे, वारदोली, तुराडे, कसळखंड, पाली देवद, चिंध्रन, हरीग्राम, वाजे, चिखले, कोप्रोली या ठिकाणी अनेक बांधकामे सुरू आहेत.  पनवेल रेल्वेस्थानकाच्या बाजूला भाडय़ाने गाळे घेऊन त्या ठिकाणी शेकडो जणांनी आपली कार्यालये थाटली आहेत. कमी किमतीत घरे उपलब्ध असल्याची जाहिरात करून काही मंडळी ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. हक्काच्या निवा:यापोटी ग्राहकसुध्दा कायदेशीर पडताळणी न करता संबंधिताला पैसे देऊन मोकळे होत असल्याची अनेक उदाहरणो घडली आहेत. हे भामटे बिल्डर एखाद्या शेतक:याला ठरावीक रक्कम देऊन त्याच्याशी करार करतात व प्रोजेक्टचा फलक लावून बुकिंग सुरु करतात. याशिवाय कलेक्टर एन.ए. मिळाली आहे, पंधरा दिवसात क्लिअरन्स मिळाला की बांधकाम सुरू करू, अशा थापा मारून ही मंडळी वेळ मारून नेतात आणि काही दिवसात चंबु गबाळे आवरून पलायन करीत असल्याच्या अनेक घटना पनवेल परिसरात घडल्या आहेत. 
नुकतेच अवघ्या तीन लाख रूपयांमध्ये 45क् चौरस फुटाचे घर देतो असे  प्रलोभन दाखवून नासीर खान या बांधकाम व्यावसायिकाने पलायन केले. त्याच्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आणखी चार गुन्हे खांदेश्वर पोलिसांमध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी काहींना पोलिसांनी अटकही केली आहे. तसेच काही तक्रार अर्ज सुध्दा आले असून त्याची पडताळणी पोलीस करीत आहेत. 
पनवेल शहर पोलिसांकडेही फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 
 
सुट्टीच्या दिवशी गर्दीच गर्दी 
4रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी मुंबई आणि उपनगरातून पनवेल परिसरात घरे पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात ग्राहक येतात. अनेक जण स्वस्त घरे मिळत असल्याने कागदपत्रंची तपासणी न करता बुकिंगही करतात. पायाभूत सुविधांचाही ते विचार करीत
नाहीत.
 
नवीन पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतही बांधकाम व्यावसासिकांकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्या आहेत. आम्ही सत्यता  पडताळून पहात असून त्यानुसार कारवाई करण्यात येईल. 
- सुरेंद्रनाथ देशमुख, 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
 
आम्ही अनधिकृतपणो बांधकाम करणा:या व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत, त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता सिडकोला पत्रही दिले. 
- पवन चांडक, तहसीलदार, पनवेल