Join us  

स्वस्त घरांच्या नावाखाली लूट

By admin | Published: October 26, 2015 1:29 AM

म्हाडा वसाहतीत स्वस्तात घरे मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या चौकडीचा विक्रोळी पोलिसांनी पर्दाफाश केला

मुंबई : म्हाडा वसाहतीत स्वस्तात घरे मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या चौकडीचा विक्रोळी पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन गाडा, दिनेश प्रवीण फोफरिया, कृष्णा नाभिसिंग दुमाना, संतोष आणि दीपक अशी आरोपींची नावे आहेत. सध्या सगळे आरोपी फरार असून, विक्रोळी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.आशिया खंडातील सर्वांत मोठे संक्रमण शिबिर म्हणून विक्रोळीच्या कन्नमवार नगरची ओळख आहे. म्हाडा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सध्या या परिसरात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. अवघ्या ३ लाखांपासून ते १० लाखांपर्यंत येथे सररासपणे घरांची विक्री होत आहे. विक्रोळीसारख्या ठिकाणी स्वस्तात घर मिळत असल्याने अनेक सर्वसामान्य कुटुंबे या आमिषाला बळी पडत होती. विक्रोळी येथील रहिवासी असलेले मंदार कांबळे यांनी या आमिषाला बळी पडून या चौकडीला १० लाख रुपये दिले होते. २०१३ ते २०१४ दरम्यान वेळोवेळी विविध कारणे दाखवून कांबळेसह जवळपास १२ जणांना तब्बल ५७ लाख ३० हजार रुपयांचा या चौकडीने गंडा घातला. अद्याप यापैकी कुणालाही अटक झालेली नाही. पाचही आरोपी दलाल म्हणून काम करत असून, विक्रोळी परिसरात वास्तव्यास आहेत. (प्रतिनिधी)