पंतप्रधान मोदींचा आठवले यांना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:18 AM2020-11-22T09:18:00+5:302020-11-22T09:18:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना फोन करून प्रकृतीची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. स्वतः आठवले यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली.
कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यानंतर लक्षणे नसतानाही खबरदारीचा उपाय म्हणून ते रुग्णालयात दाखल झाले होते. बारा दिवसांच्या उपचारानंतर घरी परतल्यावरही काही दिवस अलगीकरणात होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज फोन करून माझ्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. माझी तब्येत अधिक चांगली व्हावी यासाठी पंतप्रधानांनी मला शुभेच्छा दिल्याबद्दल आभारी आहे’, असे ट्विट आठवले यांनी केले.
दरम्यान, वीज बिल ५० टक्के माफ करण्याची मागणी आठवले यांनी केली. वीज वापरली हे खरे असले तरी लॉकडाऊनच्या काळात आर्थिक उत्पन्न नसल्याने सामान्यांचे हित पाहणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. बिल ५० टक्के माफ होत नाही तोपर्यंत वीज बिल भरू नये, असे आवाहन आठवले यांनी केले.