Join us

पंतप्रधान मोदी आज मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 05:45 IST

पतंप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता पंतप्रधान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करतील.

मुंबई : पतंप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १० वाजता पंतप्रधान एशियन पायाभूत गुंतवणूक बँकेच्या वार्षिक सभेला संबोधित करतील.मुंबई भाजपाने आयोजित केलेल्या आणीबाणीविरोधी दिनानिमित्त कार्यक्रमात ते सहभागी होतील. आणीबाणीविरोधात लढलेल्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांची चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी उपस्थित राहतील. यानंतरपंतप्रधान राजभवनात उद्योगपतींशी चर्चा करतील.

टॅग्स :नरेंद्र मोदी