मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. अहमदनगर येथील विविध कामांचे ते उद्घाटन करणार आहेत, तसेच ते शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतलं. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सोडवावा अशी मागणी केली आहे.
PM मोदींच्याहस्ते जलपूजन अन् लोकार्पण; निळवंडे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आले पाणी
आज पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षात बरेचजण येत आहेत. अनेकजण येत्या काही दिवसात आमच्याकडे येणार आहेत, आता सुरू असलेलं राजकारण गाढून काढण्यासाठी सगळीजण येत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा कसा सुटेल यावर काम केलं पाहिजे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे. मराठा समाज दुसऱ्याचा हक्क मागत नाही. लोकसभेत खास अधिवेशन घेऊन लोकांना न्याय द्यायला पाहिजे.
"मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तुम्ही भर सभेत शपथ घ्या, पण त्यासाठी मार्ग काय आहे तो लोकांना समजावून सांगा. शपथ घेण हा भावनिक प्रकार झाला. मराठा समाजाला मार्ग दाखवा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान आज महाराष्ट्रात आहेत, त्यांच स्वागत आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सोडवावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
PM मोदींच्याहस्ते जलपूजन अन् लोकार्पण
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करून डाव्या कालव्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दुपारी झाले. यावेळी राजूयपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.