Join us

पंतप्रधान मोदींचा दौरा, रस्ते वाहतुकीत बदल; वंदे भारत एक्स्प्रेसला दाखवणार हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:36 AM

सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८वर वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविण्याबरोबरच विविध कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थिती लावणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 

सीएसएमटी स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८वर वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड तसेच कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  पूर्व द्रुतगती मार्ग, पी.डीमेलो रोड, शहीद भगतसिंग रोड (सर्व बाजू रस्तेसह) शुक्रवारी दुपारी १४.४५ वा. ते १६.१५ वा. पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या काळात खालील पर्यायी मार्ग उपलब्ध असतील. 

सी.एस.टी. जंक्शनवरून पूर्व मुक्त मार्गाने चेंबुरकडे जाणारी वाहने, डी.एन.रोडने सर जे. जे. ब्रीज वरून दादर- माटुंगावरून चेंबूरकरिता पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करतील. 

चर्चगेट रेल्वे स्थानकावरून पूर्व मुक्त मार्गाने चेंबूरकडे जाणारी वाहने वीर नरिमन रोडने सीटीओ जंक्शन- हजारी महल सोमानी मार्ग सीएसटी जंक्शन सर जे. जे. उड्डाणपूल- दादर-माटुंगावरून चेंबूरकरिता पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करतील. 

कफ परेड - नेव्ही नगरवरून पूर्व मुक्त मार्गाने चेंबूरकडे जाणारी वाहने नाथालाल पारेख मार्ग बधवार पार्क जंक्शन भोसले मार्ग मंत्रालय- गोदरेज जंक्शन- डॉ. आंबेडकर जंक्शन-सी.टी.ओ. जंक्शन- हजारी महल सोमानी मार्ग- सीएसएमटी जंक्शन सर जे.जे. ब्रीज वरून दादर-माटुंगावरून चेंबूरकरिता पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करतील. 

वाशीहून सीएसएमटी, कुलाबा चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी ईस्टर्न फ्री वे चा वापर न करता मानखुद-चेंबूर छेडा नगर-सुमन नगर जंक्शन- सायन- माटुंगा दादर-भायखळा (पूर्व द्रुतगती महामार्ग) सर जे. जे. उड्डाणपूल सी. एस. एम. टी. जंक्शनवरून इच्छित स्थळी मार्गस्थ होतील. 

टॅग्स :नरेंद्र मोदीवाहतूक कोंडीमुंबई