नरेंद्र मोदी पुन्हा एका संकटात धावून आले; राज्यांची जबाबदारीही शिरावर घेतली- प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 07:35 PM2021-06-07T19:35:59+5:302021-06-07T19:36:57+5:30

राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

PM Narendra Modi again ran into a crisis; Said BJP Leader Praveen Darekar | नरेंद्र मोदी पुन्हा एका संकटात धावून आले; राज्यांची जबाबदारीही शिरावर घेतली- प्रवीण दरेकर

नरेंद्र मोदी पुन्हा एका संकटात धावून आले; राज्यांची जबाबदारीही शिरावर घेतली- प्रवीण दरेकर

googlenewsNext

मुंबई: भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. देशात आतापर्यंत २३ कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. तसेच लस तयार करणाऱ्या कंपन्यांना हवं तेवढं सहकार्य केलं, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

केंद्र सरकारच यापुढे सर्व वयोगटाचे लसीकरण करणार आहे. राज्यांना दिलेली 25 टक्के जबाबदारी देखील भारत सरकार उचलणार आहे. दोन आठवड्यांत ही व्यवस्था लागू केली जाईल. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवशी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्यांना मोफत लस देणार आहे. देशातील कोणत्याही राज्य सरकारांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, अशी घोषणा मोदी यांनी केली. नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेनंतर राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

प्रवीण दरेकर ट्विट करत म्हणाले की, पुन्हा एकदा नरेंद्र मोदी संकटात धावून आले. नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या असून राज्यांची जबाबदारीही त्यांनी आपल्या शिरावर घेतली आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच आता देशातील प्रत्येक नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण होणार असल्याचे सांगत, राज्याला लसीकरणासाठी खर्च करावा लागणार नाही, असं प्रवीण दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकार मोफत लस उपलब्ध करुन देणार असलं तरी ज्यांना पैसे देऊन खासगी रुग्णालयांकडून लस घ्यायची असेल त्यांचाही विचार करण्यात आल्याचं मोदी म्हणाले. "ज्यांना पैसे देऊन लस घ्यायची आहे त्यांच्यासाठी एकूण लस उत्पादनापैकी २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना उपलब्ध करुन दिल्या जातील. पण यावर लसीकरणासाठी लसीच्या किमतीच्यावर सेवा कर म्हणून रुग्णालयांना प्रत्येक डोसमागे १५० रुपयांपेक्षा अधिक सेवा कर आकारता येणार नाही. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारांनी घ्यावी", असं पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलं आहे. 

नियत, निती आणि परिश्रम-

कोरोना काळात भारतानं केलेल्या कामाचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारनं आजवर घेतलेल्या निर्णयांची आणि योजनांची माहिती दिली. "जेव्हा नियत साफ असते, निती स्पष्ट असते आण, निरंतर परिश्रम एखादा देश करतो तेव्हा त्याचं फळ मिळतंच. भारताने एका वर्षाच्या आत 'मेड इन इंडिया' दोन लस आणल्या. देशात सध्याच्या घडीला २३ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. भारतासारख्या मोठ्या देशात आज जर लस निर्मिती झाली नसती तर किती मोठं संकट उभं राहिलं असतं याचा विचारही करवत नाही", असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

दिवाळीपर्यंत गरीबांना मोफत धान्य-

मोफत लसीकरणासोबत पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनमुळे देशातील गरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली मोफत धान्य वाटपाची योजना यापुढील काळातही सुरू राहणार असल्याचं सांगितलं. देशातील गरीब नागरिकांना मोफत धान्य वाटप दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटापर्यंत नागरिकांना मोफत धान्य उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. याचा देशातील ८० कोटी नागरिकांना फायदा होणार असल्याचं मोदींनी सांगितलं.

Web Title: PM Narendra Modi again ran into a crisis; Said BJP Leader Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.