12 Jan, 24 08:42 PM
मनोज जरांगेंचा मोदींवर निशाणा
मनोज जरांगे पाटील यांनी मोदींच्या आजच्या दौऱ्यावर भाष्य करताना, आता मराठा कोणाच्या पाया पडणार नाहीत, आम्ही लढून आरक्षण मिळवू, असे म्हटले. ''मोदींना सर्वसामान्यांची आता गरज राहिली नाही. मोदींच्या शिर्डी दौऱ्यावेळीही मी सांगितलं होतं की, तुम्ही राज्य सरकारला निर्देश द्या, कारण राज्य सरकारच्या अधिकारात निर्णय आहे, पण त्यांनी नाही केलं. त्यामुळे, आता त्यांच्या पाया पडण्याची गरज नाही, मराठाच बलवान आहे. आम्ही लढून आरक्षण मिळवू, कारण आम्ही खूप प्रेम केलं. पण, त्यांनी आमच्या वाटेला हे आणलं, आता आमचा नाईलाज आहे'', असे म्हणत जरांगे पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील नाशिक दौऱ्यावरुन टीका केली.
12 Jan, 24 07:13 PM
मुंबई-वांद्रे सी लिंकसाठी १० वर्षे लागली
मुंबई-वांद्रे सी लिंक प्रकल्प हा अटल सेतूपेक्षाही ५ पटीने लहान आहे. पण, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी यापूर्वीच्या सरकारच्या काळात १० वर्षे लागली. तर, या ब्रिजचे बजेटही ४ ते ५ पट अधिकपटीने वाढले होते, असे म्हणत मोदींनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात मेगा प्रकल्पांचे लोकार्पण झाले, काही प्रकल्पांचे लोकार्पण मार्गावर आहेत. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले. नवी मुंबई व कोस्टल रोड प्रोजेक्टवरही वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे, मुंबईचा कायापालट होणार आहे. येणाऱ्या काळात मुंबईला पहिली बुलेट ट्रेनही मिळणार आहे. दिल्ली-मुंबई कोरिडोअर महाराष्ट्राला मध्य भारताशी जोडत आहे.
12 Jan, 24 06:06 PM
अटल सेतू लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींचे संबोधन
अटल सेतू लोकार्पणानंतर मोदींचे संबोधन
12 Jan, 24 06:03 PM
मोदींचा काँग्रेसवर निशाणा
आमची निष्ठा आणि नियत साफ आहे. म्हणूनच आज देशात मोठ मोठे विकासाची कामे पूर्ण होत आहेत. मोदींच्या गॅरंटीची गाडी आता गावागावात पोहचत आहे. मात्र, काहींना केवळ स्वत:च्या परिवाराला पुढे नेण्याचं काम केलं. स्वत:ची घरे भरण्याचं काम केलं, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
12 Jan, 24 05:55 PM
भूमिपूजन आणि लोकार्पण करण्याचं भाग्य मिळालं - मोदी
अटल सेतू हा आमच्या विकासकामांचं प्रतिक आहे, या पुलाच्या भूमिपूजनावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सांगितलं होतं, त्याप्रमाणे आज या पुलाचे लोकार्पण करण्यात आलं. शिंदे-फडणवीस-अजित पवारांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात विकास होत आहे. देश बदलत आहे, देश पुढे जात आहे. महिलांचं जीवन सुकर करण्यास प्राधान्य असल्याचंही मोदींनी यावेळी म्हटले.
12 Jan, 24 05:36 PM
मोदींच्याहस्ते भूमिपूजन आणि लोकार्पणही
आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. ‘अटलसेतू’चे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि आज तेच उदघाटन करीत आहेत. ही आमच्या कामाची गती आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, १९७३ मध्ये या मार्गाची संकल्पना निश्चित झाली. त्यानंतर ४० वर्ष काहीच झाले नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. काम करण्याची पद्धत बदलली आणि विकास कामांना गती मिळाली. आम्हाला सार्या मंजुरी तातडीने मिळाल्या आणि या अटलसेतूचे काम सुरु झाले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
12 Jan, 24 05:21 PM
लोकसभेच्या निकालानंतर राजकीय भूकंप
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय भूकंप येणार, विरोधी पक्ष तो भूकंप सहन करुन शकणार नाहीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12 Jan, 24 04:07 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल; मोदी यांच्याहस्ते अटल सेतूचं उद्घाटन
मुंबईतील ट्रान्स हार्बर अटल सेतूचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.
12 Jan, 24 04:34 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल, अन्य विकास कामांचे उद्घाटन होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळाकडे रवाना. या ठिकाणी अन्य विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
12 Jan, 24 02:29 PM
PM Modi in Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना; ट्रान्स हार्बर अटल सेतूचं उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले आहेत. ट्रान्स हार्बर अटल सेतूचं उद्घाटन करणार आहेत.
12 Jan, 24 03:13 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल; ट्रान्स हार्बर अटल सेतूचं उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमधून आता मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते ट्रान्स हार्बर अटल सेतूचं उद्घाटन करणार आहेत.
12 Jan, 24 01:54 PM
मागील सरकारपेक्षा जास्त वेगाने काम सध्याचे सरकार करतंय; मोदी
'मागील सरकारपेक्षा जास्त वेगाने काम सध्याचे सरकार करत आहे. वंदे भारत जोरात सुरू आहे. भारतातील विमानतळं आधुनिक पद्तीने तयार करण्यात आले आहेत, जगाच्या विमानतळांबरोबर त्यांची गणना होत आहे. देशात नवी एनआयटी, आयआयटी तयार केल्या. विदेशात जाणाऱ्यांना प्रशिक्षणं दिले. मेड इन इंडिया, फायटर प्लेन, तेजस आकाशाची उंची गाठत आहे, असंही मोदी म्हणाले.
12 Jan, 24 01:47 PM
युवकांचा सेवाभाव समाजाला वेगळ्या उंचीवर नेईल: पीएम मोदी
'युवकांचा सेवाभाव समाजाला वेगळ्या उंचीवर नेईल. शिक्षण, रोजगार, स्टार्ट अप, स्पोर्टस या सर्व क्षेत्रात युवकांसाठी एक सिस्टिम तयार होत आहे. युवकांसाठी आधुनिक इको स्किल सिस्टिम तयार होत आहे. युवकांच्या ताकदीची झलक सारं जग पाहतंय. १० वर्षात युवकांना विविध संधी दिल्या. अनेक युवकांना फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, युके सारख्या देशांशी संपर्क करून युवकांसाठी नव्या संधी प्राप्त करून दिल्या जात आहे, असंही मोदी म्हणाले.
12 Jan, 24 01:43 PM
'भारतातील ही युवकांची पिढी सर्वात भाग्यवान, माझा जास्त भरवसा; पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, प्रत्येकाला जीवनात वेगळी संधी असते. आजही मेजर ध्यानचंद यांना लक्षात ठेवले जाते. भगतसिंह, चंद्रशेखर आझाद यांची आठवण ठेवतो. त्यांनी आपल्या पराक्रमाने इंग्रजांना पळविले. महात्मा फूले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणात मोठी क्रांती केली. स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी देशासाठी अहोरात्र काम केले. ते देशासाठीच जगले. त्यांनी देशासाठीच संकल्प केले. देशाला नवी दिशा दिली. आता ही जबाबदारी युवकांवर आहे. देशातील युवांमध्ये सामथ्य' आहे. भारतातील ही युवकांची पिढी सर्वात भाग्यवान आहे. भारताचे युवा हे लक्ष पूर्ण करतील. माझा सर्वात जास्त भरवसा भारतीय युवकांवर आहे. असं काम करा की पुढची पिढी आठवण ठेवेल. युवकांचे सामथ्य' हेच समाजाला उंचीवर नेऊन ठेवेन, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
12 Jan, 24 01:34 PM
आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा'; मोदींची मराठीत भाषणाला सुरुवात, सभागृहात एकच जल्लोष
आजचा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. हे माझे भाग्य आहे की, स्वामी विवेकांनंदाच्या जयंतीसाठी नाशिक येथे आलो आहे. भारत की नारी शक्ती राजमाता जिजाऊ यांची जयंतीही आहे. जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन करण्यासाठी मी येथे आलो, याचा मला खूप आनंद होत आहे असं पंतप्रधान नरेंद्र यांनी मराठीत सांगताच सभागृहात एकच जल्लोष झाला.
12 Jan, 24 01:16 PM
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण; मोदी यांच्याकडून युवकांना टाळ्या वाजवून प्रतिसाद
युवा महोत्सवाच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण. मोदी यांच्याकडून युवकांना टाळ्या वाजवून प्रतिसाद.
12 Jan, 24 12:59 PM
नाशकात युवकांचा मोठा कुंभ,आमच्यासाठी अभिमानाचा क्षण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक- नाशकात युवकांचा मोठा कुंभ होत असून हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. भगवान राम, लक्ष्मण, सीता पंचवटीत येऊन गेले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकात आले हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. अयोध्येतील राममंदिर होत आहे, हा प्रत्येक देशवासियांचे स्वप्न पूर्ण होत आहे. ‘मोदी है तो मूमकीन ह’चा असे सांगत देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघू शकत नाही. याचे सर्व श्रेय पंतप्रधानांना जाते, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
12 Jan, 24 12:56 PM
युवा संमेलनाच्या शोभा यात्रेत मंत्री दादा भुसे यांनी तीन पावली नृत्य करीत सहभाग
नाशिक: राष्ट्रीय युवा संमेलनाच्या शोभा यात्रेत मंत्री दादा भुसे यांनी तीन पावली नृत्य करीत सहभाग.
12 Jan, 24 12:49 PM
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी खेलो इंडिया, फिट इंडियाचा दिला मंत्र
राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. यावेळी त्यांनी युवा खेलो इंडिया, फिट इंडियाचा मंत्र दिला. एक भारत श्रेष्ठ भारतचा नाराही दिला.
12 Jan, 24 12:40 PM
युवा महोत्सव सभागृहात हजारो युवकांसाठी मोदी मोदीचा गजर
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी व्यासपीठावर आगमन. समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे यांची उपस्थिती. पंतप्रधानांना मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदाचा फोटो भेट. प्रास्ताविक केंद्रीय माहिती व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर प्रास्ताविक करत आहे.
12 Jan, 24 12:34 PM
पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युवा महोत्सव ठिकाणी दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा महोत्सव ठिकाणी दाखल झाले आहेत. या ठिकाणी मोदींच्या हस्ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.
12 Jan, 24 11:58 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले.
12 Jan, 24 12:00 PM
पंतप्रधानांच्या रोड शो ने संचारला युवा महोत्सवात उत्साह; फक्त पंधरा मिनिटे चालला रोड शो
वंदे मातरम, भारत मातेचा जयघोष, मोदी मोदीचा गजर...जिकडे तिकडे उंचावलेले हात...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी टिपण्यासाठी सुरू असलेली धडपड... रस्त्याच्या दुतर्फा असलेली प्रचंड गर्दी, फुलांची उधळण, एकाहून एक असा सरस कलाविष्कार असा अमाप उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शाेला दिसला. पंतप्रधानांनी देखील हात उंचावून उपस्थितांना दाद दिली. युवा वर्गाचा उत्साह अधिक प्रमाणात दिसून आला. जवळपास एक लाख नागरिकांनी रोड शो ला हजेरी लावली.
मोदी यांच्या कार्यक्रमात बदल झाल्याने रोड शो आटोपता घ्यावा लागला. रोड शो फक्त पंधरा मिनिटे चालला.
12 Jan, 24 11:41 AM
१५ मिनिट पूजा करून पंतप्रधान मोदी राम मंदिराकडे रवाना
पीएम नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामकुंड येथे पुजा झाली. जलपूजनाची १५ मिनिटे पूजा झाल्यानंतर पीएम मोदी राम मंदिराकडे रवाना झाले आहेत.
12 Jan, 24 11:08 AM
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो ला सुरुवात
नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो ला सुरुवात झाली आहे. या रोड शो मध्ये पीएम मोदी यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत.
12 Jan, 24 11:25 AM
रामकुंड येथे पीएम मोदींच्याहस्ते जलपूजन
पीएम नरेंद्र मोदी यांच्याहस्ते रामकुंड येथे पुजेला सुरुवात. रामकुंडावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शुक्ल आणि टीम करतेय पौरोहित्य.
12 Jan, 24 10:46 AM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन
नाशिक - राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
12 Jan, 24 10:46 AM
अटल सेतूचे ३.३० वाजता करणार उद्घाटन
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक अर्थात अटल सेतूच्या लोकार्पणासह सूर्या प्रकल्प आणि उरण-नेरूळ रेल्वेमार्गासह सुमारे ३० हजार ५०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमारास अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा सेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून, प्रवाससुद्धा करणार आहेत.
12 Jan, 24 10:34 AM
अनोखा कलाविष्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यानच्या रस्त्यावर कलाविष्कार डोळ्याचे पारणे फेडत आहे. आदिवासी नृत्य कला तसेच विविध राज्यांचे नृत्य,ढोल पथक आकर्षण ठरत आहे. जवळपास ५० हून अधिक कलापथक हे रोड शोच्या दरम्यान सहभागी झालेले आहेत.
12 Jan, 24 10:17 AM
नाशिकमध्ये तपोवन परिसरात चोख बंदोबस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो शुक्रवारी सकाळी १० वाजता होणार असल्याने तपोवन परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. काळाराम मंदिरात दर्शन, गोदा आरती या नंतर ते राष्ट्रीय युवा संमेलनाचे उद्घाटन करतील.