पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएल प्रवर्तकासह मुलाचा अंतरिम जामीन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:33 AM2020-05-20T02:33:14+5:302020-05-20T02:33:31+5:30

बचाव पक्षाच्या वकिलांनी संबंधित जामीन अर्जाची माहिती तपास यंत्रणेला दिली नसल्याची बाबा न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिस्सर यांनी सांगितले.

PMC Bank scam: Interim bail of child with HDIL promoter canceled | पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएल प्रवर्तकासह मुलाचा अंतरिम जामीन रद्द

पीएमसी बँक घोटाळा : एचडीआयएल प्रवर्तकासह मुलाचा अंतरिम जामीन रद्द

googlenewsNext

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेला एचडीआयएलचा प्रवर्तक राकेश वाधवान व त्याचा मुलगा सारंग यांचा अंतरिम जामीन दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी रद्द केला. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोघांचाही अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने (ईओडब्ल्यू) तत्काळ या आदेशावर स्थगिती घेत जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. बचाव पक्षाच्या वकिलांनी संबंधित जामीन अर्जाची माहिती तपास यंत्रणेला दिली नसल्याची बाबा न्यायालयाच्या निदर्शनास आणल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिस्सर यांनी सांगितले. मंगळवारी न्यायालयाने या दोघांचाही अंतरिम जामीन रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वाधवान पिता-पुत्राला गेल्यावर्षी आॅक्टोबरमध्ये अटक करण्यात आली. बँकेचे अनेक मोठे अधिकारीही आरोपी आहेत. बँकेने एचडीआयला ६,७०० कोटींचे कर्ज देण्यासाठी काही बनावट बँक खाती उघडल्याचे आरबीआयने उघडकीस आणल्यानंतर अटकसत्र सुरू झाले.

Web Title: PMC Bank scam: Interim bail of child with HDIL promoter canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.