PNB Scam : आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँकेची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 05:40 AM2018-03-07T05:40:21+5:302018-03-07T05:40:21+5:30
नीरव मोदी व मेहूल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) घडविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर व अॅक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांना घोटाळाविरोधी तपास संस्थेने (एसएफआयओ) समन्स जारी केले. तपास संस्थेने त्यांना स्वत: हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
- संतोष ठाकूर
मुंबई/नवी दिल्ली -नीरव मोदी व मेहूल चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) घडविलेल्या कोट्यवधी
रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर व अॅक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांना घोटाळाविरोधी तपास संस्थेने (एसएफआयओ) समन्स जारी केले. तपास संस्थेने त्यांना स्वत: हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मेहूल चोक्सी याच्या गीतांजली समूहाला आयसीआयसीआय बँकेने १ हजार कोटींचे, तर अॅक्सिस बँकेने ७00 कोटींचे कर्ज दिले आहे. ही दोन्ही कर्जे गेल्या वर्षी दिली आहेत. दोन्ही बँकांनी चौकशीसाठी मंगळवारी आपल्या प्रतिनिधींना पाठवले.
मात्र तपास संस्थेने त्यावर नाराजी व्यक्त केली आणि कोचर आणि शर्मा यांना स्वत: हजर राहण्यास सांगितले आहे. पीएनबी घोटाळ्यासह अन्य बँकांचीही प्रकरणे उघड होत असल्याने काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष सरकारला धारेवर धरत आहेत. आता दोन बड्या बँकांच्या प्रमुखांनाच चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्याने सरकारची आणखी अडचण होणार आहे.
अॅक्सिसच्या अधिकाºयांची झाली चौकशी
अॅक्सिस बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही. श्रीनिवासन व अन्य वरिष्ठ अधिकाºयांची एसएफआयओने मंगळवारी दोन तास चौकशी केली.
एलओयू का तपासले नाहीत?
सूत्रांनी सांगितले की, गंभीर घोटाळा तपास कार्यालयाने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) याआधीच नोटीस बजावली आहे. आता इतर बँकांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. या प्रकरणात पीएनबीची मुख्य भूमिका राहिली असली तरी
इतर बँकांनीही विशेष खबरदारी घेतली नसल्याचे तपासातून समोर येत आहे. पीएनबीने जारी केलेल्या लेटर आॅफ
अंडरस्टँडिंगवर (एलओयू) अन्य बँकांनी नीरव मोदी व मेहूल चोक्सी यांच्या कंपन्यांना कर्जे दिली. एलओयू जारी करताना पीएनबीच्या अधिकाºयांनी बनवेगिरी केली हे खरे असले तरी या एलओयूंची कोणतीही पडताळणी न करता इतर बँकांनी कर्जे अदा केलीच कशी, असा प्रश्न आहे.