मुंबई : परदेशातील रस्त्यांवर धावणाऱ्या पॉड टॅक्सी आता वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) रस्त्यांवर धावताना दिसणार आहेत. या भागातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी वांद्रे ते कुर्लादरम्यान या टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेण्यातआला आहे.
सार्वजनिक-खासगी-भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाणार असून, त्यासाठी एक हजार १६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मंगळवारी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये-पॉड टॅक्सी मार्गाची लांबी - ८.८ किमी.-मार्ग - कुर्ला रेल्वे स्थानक ते वांद्रे रेल्वे स्थानक-स्थानके - ३८ -पॉड टॅक्सीचा वेग -४० किमी प्रतितास-पॉड टॅक्सीची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता - ६ प्रवासी
म्हणून ट्राम शक्य नाहीपरिणामी, या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या मार्गावर प्रभावी प्रवासी वाहतुकीसाठी विविध पर्यायांची चाचपणी ‘एमएमआरडीए’कडून केली जात होती.
त्यावर तोडगा काढण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ‘ली असोसिएट्स’ या सल्लागाराची ऑक्टोबर २०२० मध्ये नियुक्ती केली होती. या मार्गावर ‘लाईट ट्रान्झिट सिस्टीम’ म्हणजेच आधुनिक ट्राम चालविली जाऊ शकते का? याची चाचपणी ‘एमएमआरडीए’ने केली होती.
मात्र, वांद्रे ते बीकेसीदरम्यानच्या अरुंद रस्त्यांवर ट्राम चालविणे शक्य नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली. आता बीकेसीत पॉड टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चार लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत-बीकेसी हे देशातील प्रमुख आर्थिक केंद्र असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते नावारूपाला येत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील मुख्यालये, जगभरातील विविध बँका, वित्तीय संस्थांची कार्यालयेही येथे आहेत.-सध्या बीकेसीत सुमारे चार लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. तेवढेच लोक दरदिवशी बीकेसी परिसरात कामानिमित्त येतात. ते सर्वजण वांद्रे किंवा कुर्ला रेल्वे स्थानकांत उतरल्यानंतर सार्वजनिक, खासगी वाहनांनी बीकेसीत येतात.