पोद्दारच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 04:31 AM2018-03-11T04:31:12+5:302018-03-11T04:31:12+5:30
पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अांदोलन अखेर १३व्या दिवशी म्हणजेच शनिवारी मागे घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या, तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हेदेखील लेखी स्वरूपात मिळाल्याची माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली.
मुंबई - पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे अांदोलन अखेर १३व्या दिवशी म्हणजेच शनिवारी मागे घेण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या, तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, हेदेखील लेखी स्वरूपात मिळाल्याची माहिती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ शनिवारी अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी यांच्या भेटीस गेले असता, त्यांना मुख्य मागण्यांचे निवेदन लेखी स्वरूपात देण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत झालेला अन्याय पुन्हा होणार नाही, अशी खात्री या वेळी अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी यांनी दिली. त्याचप्रमाणे, भविष्यात विद्यार्थी आणि प्रशासनामध्ये सुसंवाद राखला जाईल, असेही सांगण्यात आले.
या महाविद्यालयात राज्याच्या कानाकोप-यातून आलेले विद्यार्थी आहेत. त्यांना वसतिगृहामध्ये राहता येणार नाही, अशा सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते.