पूश-पूलमुळे वाचणार ‘डेक्कन’ची ४० मिनिटे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:43 AM2019-05-16T01:43:58+5:302019-05-16T01:44:18+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते पुणे दरम्यान चालविण्यात येणारी डेक्कन क्वीनला पूश-पूल इंजिन लावण्यात आले आहे.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई ते पुणे दरम्यान चालविण्यात येणारी डेक्कन क्वीनला पूश-पूल इंजिन लावण्यात आले आहे. यामुळे डेक्कन क्वीनचा वेग आणि क्षमता वाढली असून प्रवाशांना मुंबई ते पुणे प्रवास २ तास ३५ मिनिटांत करता येणार आहे. यामुळे प्रवासाची ४० मिनिटे कमी होणार आहेत.
मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजिन जोडण्यात आले आहे. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेस घाट भाग कमी वेळात पार करते. याच पार्श्वभूमीवर डेक्कन क्वीनला पूश-पूल
इंजिन जोडून चाचणी घेतली असता, मुंबई ते पुणे १९२ किमीचे अंतर २ तास ३५ मिनिटांत पार केले. मुंबई ते पुणे डेक्कन क्वीनने प्रवास
करताना भोर घाट येथे बँकर इंजिन लावण्यात येते. त्यानंतर बँकर इंजिन लोणावळा येथे काढण्यात येते. त्यामुळे मुंबई ते पुणे अंतर पार करण्यासाठी ३ तास १५ मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे राजधानीला जोडण्यात आलेले पूश-पूल इंजिन डेक्कन क्वीनला जोडण्यात आले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले की, डेक्कन क्वीनला पूश-पूल इंजिन जोडण्याने घाट भागात वाया जाणारा वेळ वाचविण्यात
येणार आहे. पूश-पूल इंजिन जोडल्याने लोणावळा-पुणे
भागात ११० किमी प्रति तासाने डेक्कन क्वीन चालविण्यात येणार आहे. त्यामुळे येथे १५ मिनिटांचा कालावधी वाचला जाईल.
पूश-पूल इंजिन सोयीस्कर
कसारा घाटाच्या कठीण चढावाच्या ठिकाणी राजधानी एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागील बाजूस पूश-पूल पद्धतीचे इंजिन लावून एक्स्प्रेसला चढविण्यात येते. या इंजिनाच्या जोरावर राजधानी एक्स्प्रेसची क्षमता वाढून घाट मार्ग सुलभरित्या पार करू शकते. बँकर इंजिन लावण्यासाठी जोडण्यासाठी आणि इंजिन काढण्यासाठी जास्त वेळ खर्ची जास्त असल्याने आणि जास्त क्षमता लागत असल्याने हे इंजिन न लावता पूश-पूल इंजिन लावणे सोयीस्कर झाले आहे.