Join us

मुंबईत रविवारी रंगणार अनुभूति काव्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:22 PM

देशी भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीयस्तरावर कार्यरत असलेल्या ‘पासबान-ए-अदब’ या संस्थेच्या येत्या रविवारी (दि.३) राष्ट्रीयस्तरावर अनुभुति हिंदी काव्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.

 मुंबई : देशी भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीयस्तरावर कार्यरत असलेल्या ‘पासबान-ए-अदब’ या संस्थेच्या येत्या रविवारी (दि.३) राष्ट्रीयस्तरावर अनुभुति हिंदी काव्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. सौमय्या कॉलेजच्या सभागृहात दिवसभर विविध सत्रामध्ये चालणाºया सोहळ्यात प्रसिद्ध कवी प्रा. अशोक चक्रधर, डॉ. उदय प्रताप सिंह, डॉ. सचिदानंद जोशी, कैसर खलिद, रमेश शर्मा, संदीप नाथ, माया गोविंद आदी दिग्गज सहभागी होणार आहेत.पासबान-ए -आदबचे अध्यक्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर) कैसर खलिद आणि सचिव दानिश शेख यांनी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, भारतीय भाषा , साहित्याला चालना मिळावी, त्याच्या माध्यमातून देशात सोदार्ह व एकात्मतेची भावना दृढ करण्याच्या हेतूने गेल्या दहा वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे. त्यातर्गंत ऊर्दू, हिंदी व मराठी भाषेत मुंबईसह राज्यभरात संमेलन आयोजिले जातात. त्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर लेखक, कवी यांना निमंत्रित करण्यात येते. त्याचबरोबर होतकरू लेखक, कवींनाही संधी दिली जाते. यावर्षीचा ‘अनूभुति’कवि संमेलन ३ नोव्हेंबरला सोमय्या कॉलेजमध्ये भरणार आहे. दुपारी बारा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यत विविध सत्रामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये प्रा. अशोक चक्रधर, डॉ. उदय प्रताप सिंह, डॉ. सचिदानंद जोशी, कैसर खलिद, रमेश शर्मा, संदीप नाथ, माया गोविंद उदय प्रदीप सिंग आदी मंडळी आपले साहित्य सादर करणार आहेत. संमेलनाच्या निमित्याने भव्य व्यासपीठ बनविण्यात येणार आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. त्यासाठी अद्यावत सामु्रगी वापरली जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे. मात्र प्रवेश निश्चित करण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर १८००१२००८०००० या संकेत स्थळावर नोंद करावी, असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

टॅग्स :हिंदी