मराठी राजभाषा दिनानिमित्त शिक्षकांचे कवी संमेलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 06:39 PM2018-02-26T18:39:31+5:302018-02-26T18:39:31+5:30
मुंबई - उद्या मराठी राजभाषा दिनानिमित्त शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाच्यावतीने शिक्षक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनात उत्तर विभागातील शिक्षक सहभागी होणार असल्याचे शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख यांनी सांगितले
उद्या २७ फेब्रुवारी रोजी विद्याविहार येथील एस के सोमय्या विनयमंदिर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात दुपारी २ वाजता कवी सतीश सोळंकुरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होणार असून यामध्ये कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता व साहित्यकृतीचे सादरीकरण शिक्षकांकडून केले जाणार आहे. मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जादेखील मिळणार असून त्याबाबत सतीश सोळंकुरकर त्याबाबत व मराठी भाषेबाबत शिक्षकांशी संवाद साधणार आहे.
दैनंदिन अध्यापनाच्या व्यतिरिक्त अनेक शिक्षक लेखन करीत असतात अशा शिक्षकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळून प्रोत्साहन मिळावे यासाठी या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून शिक्षक आपल्या स्वरचित व मान्यवर कवींच्या कवितांचं वाचन करणार आहेत. उत्तर विभागातील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या काव्यसमेलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख यांनी केले आहे